★पंकजा मुंडे यांचं विधान परिषदेच्या माध्यमातून पुनर्वसन!
मुंबई : वृत्तांत
भारतीय जनता पक्षाच्या सचिव तथा माजीमंत्री पंकजा मुंडे यांना पक्षाने विधानपरिषदेवर संधी दिली आहे. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा पक्षाने केली आहे, त्यांच्यासह पाच जणांची नावे पक्षाने जाहीर केली आहेत.महाराष्ट्र विधानपरिषद साठी निवडणूक होत आहे. यामध्ये भाजपकडून पंकजा मुंडे, योगेश टिळेकर,डॉ परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना संधी देण्यात आली आहे.पक्षाचे राष्ट्रीय महा सचिव अरुण सिंह यांनी याबाबत पत्र जाहीर केले आहे.पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा निवडणुकीत अल्पशा मतांनी पराभव झाला होता, त्यानंतर त्यांना पक्षांकडून राज्यसभा किंवा विधानपरिषदेवर संधी दिली जाईल अशी चर्चा होती. दरम्यान पक्षाने सोमवारी यादी जाहीर केली.