★कुसळंबाच्या युवकांचा सुद्धा राजकारणात धबधबा
बीड | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथील ॲड.अशोक बाबासाहेब बेदरे यांची नियुक्ती करण्यात आली असून हे नियुक्तीपत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील साहेब व युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली आहे.
पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथील ॲड.अशोक बाबासाहेब बेदरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन याचा वर्षा होत असून त्यांच्या हातून पक्ष बांधणीचे संघटनेचे अधिक काम होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
★पवारसाहेबांचे व पक्षाचे विचार तळागाळात पोहोचण्यासाठी प्रयत्न करू : ॲड.अशोक बेदरे
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी माझी निवड करून माझ्यावर दाखवलेला विश्वास हा खूप मोठा असून राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास नक्कीच सार्थ पार पाडेल आणि पक्ष वाढीसाठी प्रयत्न करेल..
– ॲड.अशोक बेदरे
युवक प्रदेश कार्यकारणी सदस्य.