12.2 C
New York
Saturday, April 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

कुंडलिक खांडे यांची शिवसेनेतून हकालपट्टी!

[ कुंडलिक खांडे आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते शिवराज बांगर यांच्या संवादाची कथीत ऑडीओ क्लीप दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती ]

बीड : प्रतिनिधी

पक्षविरोधी कारवाई केल्याने शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सचिव संजय मोरे यांनी ही शनिवारी कारवाई केली.
कुंडलिक खांडे आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते शिवराज बांगर यांच्या संवादाची कथीत ऑडीओ क्लीप दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. त्यांनी यात महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना पहिल्यांदा धोका दिल्याचे सांगत महाविकास आघाडीचे उमेदवार यांना ३७६ बुथवर यंत्रणा पुरवून पैसे वाटल्याचे म्हटले होते. तसेच धनंजय मुंडे यांची गाडी फोडण्याबाबतही वक्तव्य केले होते. हे प्रकरण राज्यभर गाजल्यानंतर खांडे व बांगरविरोधात परळी व बीडमध्ये गुन्हे दाखल झाले होते. याच अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत कुंडलिक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!