★मुरमा ऐवजी माती टाकून शासनाच्या डोळ्यात धुळफेक!
आष्टी | प्रतिनिधी
नगर बीड महामार्गावर साबलखेड ते जामखेड पर्यंत सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटी रस्त्याच्या कामात निवळ बोगसगिरी असल्याचे दिसून येत आहे. मुरमा ऐवजी माती टाकून रस्ता करण्याचं काम सुरू आहे. पावसाळ्यामध्ये याच मातीचा चिखल होऊन बऱ्याच जणांचे अपघात देखील झाले आहेत. त्यामुळे या बोगस कामाकडे प्रशासन अधिकारी लक्ष देणार आहात का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
साबलखेड ते जामखेड रस्त्याच्या कामात मातीचा वापर सरसपणे होताना दिसत असताना देखील प्रशासन अधिकाऱ्याकडून कसलीच दखल घेताना दिसत नाही. नागरिकांचे हाल होत असून अनेकांचे या ठिकाणी अपघात देखील झाले आहेत तर सरळ सरळ प्रशासनाची फसवणूक करणारे गुत्तेदार मात्र पैसे काढून सुस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. या बोगस कामाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन गुत्तेदाराला सूचना द्याव्यात आणि हा रस्ता चांगला करून घ्यावा अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरतील यात शंका नाही असा इशारा देखील सर्वसामान्य जनतेतून येत आहे.
★साबलखेड ते जामखेड सिमेंट रस्त्यात बोगसगिरी
साबलखेड – कडा – जळगाव कारखाना – आष्टी – जामखेड हा सिमेंट रस्ता सुरू असून या रस्त्यावर मुरमा ऐवजी माती टाकून रस्ता काम सुरू असल्याचे दिसत आहे यामुळे चिखल मोठ्या प्रमाणात होत असून नागरिकांचे अपघात देखील होत आहेत आणि प्रशासनाच्या डोळ्यात धुळपे करून बोगसगिरीने काम सुरू असल्याचा दिसत आहे मात्र प्रशासन हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून गप्प का आहे ? हेच कळायला तयार नाही. आता याकडे प्रशासन गांभीर्याने पाहणार का ? का बोगसगिरी सरसपणे होऊन देणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.