★बप्पांना कुसळंब मध्ये येण्याचं ग्रामस्थांकडून निमंत्रण
कुसळंब | अतुल शेलार
कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जायंट किलर ठरलेल्या बजरंग बप्पा सोनवणे यांच्यासोबत कुसळंबकरानी अभिनंदन पर सत्कार बजरंग सोनवणे बाप्पा यांच्या निवासस्थानी जाऊन ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला तसेच येणाऱ्या भविष्या काळामध्ये अडचणीवर सकारात्मक चर्चा केली तेव्हा बजरंग सोनवणे यांनी कुसळंबकरांचे कौतुक करत आम्ही कुसळंबकरांकडे विशेष लक्ष देऊन काम करू असे म्हणत कुसळंब गावकऱ्यांचा नागरी सत्कार घेण्यासाठी कुसळंब मध्ये येऊन सत्कार स्वीकार करणार असेही सांगितले…त्यावेळी आवर्जून उपस्थित असणारे ह.प.भ. कैलास पवार, मेजर शिवाजी पवार, सामाजिक कार्यकर्ते अतुल शेलार, राम मोहन पवार, भाऊसाहेब पवार, सोमीनाथ (बाबू) पवार, रावसाहेब पवार, मोहन पवार, हनुमंत पवार, कुलदीप पवार, मेघराज, लक्ष्मण पवार, उद्धव पवार, विकास पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
★बजरंग बाप्पांचा कुसळंब मध्ये लवकरच नागरी सत्कार!
कुसळंब ग्रामस्थांनी नवनिर्वाचित खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या निवासस्थानी जाऊन खासदार पदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते तसेच लवकरच कुसळंब येथे नवनिर्वाचित खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांचा जाहीर नागरी सत्कार घेण्याचा सुद्धा ठरवलं असून तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याचा सुद्धा सांगितलं जात आहे.