★कुसळंब येथील सामाजिक कार्यकर्ते अतुल शेलार यांची वैचारिक संकल्पना
बीड | प्रतिनिधी
अठरापगड जाती जातीधर्मातील लोकांना आपलंसं करत वैचारिक एकोप्याचे संदेश देऊन स्वराज्य निर्माण करण्याची संकल्पना साक्षात उतरवली असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 351 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अठरापगड जातीतील युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करून एकोप्याचा संदेश दिल्याचं दिसत आहे.
कुसळंब येथील सामाजिक कार्यकर्ते अतुल शेलार हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असून वैचारिक विचार पेरण्यासाठी काम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख जिल्हाभर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा 351 वा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना आपण आपली सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो या हेतून चक्क कुसळंब येथून बीड येथे जाऊन सिविल हॉस्पिटल मध्ये रक्तदान करून शिवराज्याभिषेक दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प त्यांनी जोपासलेला पाहायला मिळालं. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल आणि संकल्पनेबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.
★मराठासेवक स्वप्नील गलधर व प्रबोधनकार अजिंक्य चांदणे यांच्याकडून कौतुक!
शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात महाराष्ट्रभर साजरा होत असताना कुसळंब येथील सामाजिक कार्यकर्ते अतुल शेलार यांनी बीड येथे सिविल हॉस्पिटल मध्ये जाऊन रक्तदान केले त्या क्षणी त्यांची भेट मराठासेवक स्वप्निल गलधर व प्रबोधनकार अजिंक्य चांदणे यांच्याशी झाली आणि त्यांना हे रक्तदानाचा समजल्या क्षणी त्यांनी दोघांनीही कौतुकाची थाप अतुल यांच्या पाठीवर दिल्याने अधिकच प्रेरणा मिळाल्याच्या भावना अतुल शेलार यांनी व्यक्त केल्या आहेत.
★महापुरुषांचे विचार आणि चळवळ टिकली पाहिजे – अतुल शेलार
महापुरुषांनी जे आपल्याला विचार दिले आहेत ते आत्मसात करून माणुसकी धर्माचे पालन केले पाहिजे व त्याच माणुसकी धर्मासाठी अठरापगड जातीतील लोकांनी स्वराज्य घडवलं ते रयतेसाठी घडवलं आणि रयतेसाठी प्रबोधनाच्या माध्यमातून अनेकांनी स्वतःला वाहून घेतलं तर अनेकांनी बलिदानही दिले परंतु हे आत्ताच्या पिढीमध्ये रुजायला तयारच नाही आत्ताचे युवक राजकारणात वाहून घेतलेले दिसत आहे पण हे बदललं पाहिजे म्हणूनच मी आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान करून आणि घरी जाताना महापुरुषांचे पुस्तक घेऊन विचार आत्मसात करणार असून चळवळ टिकवण्यासाठी प्रयत्न करत राहणार आहेच पण महापुरुषांच्या विचाराचा महान संदेश देण्याचा प्रयत्न करत राहणार आहे.
– अतुल शेलार
सामाजिक कार्यकर्ते कुसळंब.