★विजयी झाल्यावर खासदार बजरंग सोनवणे यांची गळा भेट!
★संविधान बचावाच्या या लढाईमध्ये आपल्याला निवडून आणणारच हा दिलेला शब्द..!
बीड | अतुल शेलार
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्षवेधी असणारे बीड लोकसभा निवडणूक ठरली अतिशय अटीतटीच्या आणि उशिरापर्यंत चाललेल्या काउंटिंग रिकॉउंटिंग मध्ये बजरंग बापाने घेतलेली यशस्वी भरारी ही खूप महत्त्वाची आणि मोठी आहे पण या विजयामध्ये पडद्याआड चे बरेच हिरो आहेत त्यापैकी एक अजिंक्य भैय्या चांदणे त्याचबरोबर संपूर्ण डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया हे देखील तेवढेच महत्त्वाचे या ठिकाणी घटक ठरलेले आहेत. शरद पवार साहेबा बरोबर झालेली युती संपूर्ण महाराष्ट्रभर अहो रात्रभर फिरून व सभा घेऊन मतदाराच्या मनावरती अदिराज्य बिंबवलं आणि ते या निकालांच्या माध्यमातुन निश्चितपणे पाहायला देखील मिळाले.
★बीड निवडणूकीत अजिंक्य चांदणे ठरले पॉलिसी मेकर
डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राज्य अध्यक्ष अजिंक्य चांदणे बीड लोकसभा मतदार संघात बजरंग सोनवणे यांच्या विजयाच्या वाट्यात पॉलिसी मेकर ठरले आहेत.महाविकास आघाडी सोबत राज्यातील सभा गाजवत असताना चांदणे यांनी आपले होम पीच असणाऱ्या बीड लोकसभेवर मात्र वैयक्तिक लक्ष घालून ते स्वतः राहत असलेल्या पेठ बीड या भागाची ही पॉलिसी आखून बजरंग सोनवणे यांच्या मताच्या वाट्यात भर टाकण्यात यशस्वी झाले. बीड स्थानिकला असणारे प्रस्थापित धनदांडगे, जात दांडगे नगरसेवक हे सगळे सोनवणे यांच्या विरोधात असताना योग्य प्लॅनिंग व पॉलिसी रचून अत्यंत संयमाने हा विजय खेचून आणण्यात अजिंक्य चांदणे यांची पॉलिसी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.बीड लोकसभेचे वातावरण सुरुवातीपासूनच तापलेले होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बीड लोकसभा उमेदवार बजरंग सोनवणे यांचा विजय निश्चित होण्यासाठी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे राज्य अध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी डोर टू डोर तगडी प्रचार यंत्रणा राबविली होती. एवढेच नव्हे तर विजयासाठी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियने विजय मिळावा देखील घेतला होता. बजरंग सोनवणे यांना उमेदवारी घोषित झाल्यापासून अजिंक्य चांदणे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत होते. निवडणूक संदर्भात त्यांनी शरद पवार यांच्याशी वारंवार चर्चा आणि भेटी घेऊन विजयाचे रणसिंग फुंकले होते. कुणाच्याही दबावाला आणि षडयंत्राला भीक न घालता तगडी प्रचार यंत्रणा राबवून बजरंग सोनवणे यांचा विजय खेचून आणण्यासाठी अजिंक्य चांदणे पॉलिसी मेकर ठरले आहेत, असेच म्हणावे लागेल.