14.7 C
New York
Saturday, April 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

बीडमध्ये बजरंगाची धमाल, पंकजा मुंडे यांचा पराभव

★बजरंग सोनवणे 6585 मतांनी विजयी!

बीड | सचिन पवार

राज्यात लक्षवेधी ठरलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या पंकजा मुंडेंचा 6 हजार 585 मतांनी पराभव केला. रात्री उशिरा पर्यंत सुरू असलेल्या मतमोजणीत सोनवणेंनी बाजी मारताच शरद पवार गटात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. सोनवणेंचा हा विजय मोठा मानला जात आहे.
बीडमध्ये भाजपकडून पंकजा मुंडेंचे तिकीट फिक्स केल्यानंतर बजरंग सोनवणेंनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातून शरद पावर गटात प्रवेश केला. शरद पवारांनी त्यांना उमेदवारी देत मुंडेंसमोर मोठे आव्हान उभे केले. त्यास पात्र ठरत बजरंग सोनवणेंनी बीडमधून निसटता का निसटता का होईला विजय खेचून आणला.पंकजा मुंडेंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठी ताकद लावली. मंत्री धनंजय मुंडेंनी बहीण पंकजा यांना निवडून आणण्यासाठी सर्व काही चाली खेळल्या. तर सोनवणेंसाठी शरद पवारांनी आपल्या अनुभव पणाला लावत योग्य नियोजन केले. उद्धव ठाकरे, काँग्रेसच्या नेत्यांनीही रसद पुरवली. मात्र मतदानादिवशी अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याचा आरोप बजरंग सोनवणेंनी केला होता. यामुळे आधीच चर्चेत असलेल्या हा मतदारसंघ हिटलिस्टरच आला.दरम्यान, मराठवाड्यातील मराठा आंदोलनाचा थेट फटका बीड, जालना, नांदेड, परभणी या मतदारसंघाना बसल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीत बीडमध्ये ओबीसी आणि मराठा मतांचे ध्रुवीकरण झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे सोनवणेंच्या विजयात महाविकास आघाडीच्या ताकदीसह जरांगे फॅक्टरही लागू होतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.मतमोजणीत कधी बजरंग सोनवणे तर कधी पंकजा मुंडे आघाडीवर होत्या. त्यांच्यातील मताधिक्य हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच असायचे. त्यामुळे बीडकरांची धाकधूक कायम कमीजास्त होत होती. दरम्यान, मतमोजणीत सोनवणेंचा कमी मतांनी विजय झाल्याचे पाहून मुंडेंनी फेरमतमोजणीची मागणी केली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मोजणी सुरू होती. त्यात सोनवणेंचा 6 हजार 585 मतांनी सोनवणे विजयी झाल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!