★ दोन कोटीच्या खंडणीची मागणी
केज | प्रतिनिधी
केज जवळील महामार्गावरील टोल नाक्या जवळ गाडी अडवून गावठी कट्टयाचा धाक बारा ते तेरा जणांनी पवन चक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्याचे अपहरण करून त्याच्याकडे दोन कोटी रु च्या खंडणीची मागणी केली असल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.
या बाबतची माहिती अशी की, अवादा या पवनचक्की प्रकल्पाच्या उभारणीचे काम करीत असलेले टागोर नगर नाशिक जिल्ह्यातील टागोर नगर येथील सुनिल केदु शिंदे (ह. मु. जालना रोड बीड) आणि त्यांचे सहकारी हे दि. २८ मे रोजी रात्री बीड कडून केजकडे येत असताना त्यांना रात्री सुमारे ११:०० वा च्याच सुमारास मस्साजोग ते केज दरम्यान गंगा माऊली साखर कारखान्याला जवळ असलेल्या टोल नाक्याच्या पुढे एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडी क्र (एम एच १५/ ई बी २६८२) सीह्याचं चालकाने एशर करून त्यांची गाडी थांबविण्याचा इशारा केला एका त्यांच्या सुनील शिंदे यांनी गाडी थांबवली असता रमेश घुले रा. केज याने अधिकारी सुनिल शिंदे यांना आपण अधिगृहण करीत असलेल्या पवनचक्कीच्या जागे संदर्भात बोलायचे आहे. असे म्हणुन रमेश घुले रा. केज याने त्याच्या कडील गावठी कट्ट्याचा धाक दाखवुन त्याचे सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी संगणमत करुन बळजबरीने सुनिल शिंदे यांचे अपहरण करुन त्याच्या स्कार्पिओ गाडीमध्ये बसवुन त्यांना माजलगाव मार्गे अहमदनगर जिल्ह्यातील खरवंडी ता. पाथर्डी येथे घेवुन गेले. तेथे त्यांनी सुनिल शिंदे आणि त्यांचे सहकारी यांना कंपनीचे काम करायचे असेल तर दोन कोटी रु. ची खंडणी दयावी लागेल अशी धमकी देत खंडनीची मागणी केली.दरम्यान सुनिल शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची सुटका करून घेत केज दि. २९ मे रोजी रात्री के ज पोलीस ठाण्यात रमेश घुले आणि त्याचे अकरा ते बारा साथीदार यांच्या विरुद्ध अपहरण करून खंडणी मागणे व शस्त्र प्रतिबंधक कायद्या नुसार के ज पोलीस ठाण्यात गु. र. नं. २८५/२०२४ भा. दं. वि. ३६५, ३८५, १४३, १४७, १४८, १४९या सह शस्त्र प्रतिबंधक कायदा कलम ४, २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक आनंद शिंदे हे तपास करीत आहेत.