17.1 C
New York
Wednesday, August 27, 2025

Buy now

spot_img
spot_img

सुरेश कुटेंवर न्यायालयाची टांगती तलवार ; गुन्हा दाखल करण्याचे आदेश 

सुरेश कुटेंवर न्यायालयाची टांगती तलवार ; गुन्हा दाखल करण्याचे आदेश 

बीड | प्रतिनिधी

येथील ज्ञानराधा मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुरेश कुटे यांच्याकडून वारंवार ठेवी देण्याचे आश्वासन देण्यात आले. परंतु अनेक तारखा देऊनही ठेवी परत मिळाल्या नाहीत. या प्रकरणी ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट सोसयटीच्या संचालक मंडळासह अधिकाऱ्यांवर तीन प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश एस.टी. डाेके यांनी शिवाजी नगर पोलिसांना शुक्रवारी दिले.
बीड येथील अमोल चंद्रकांत वळे, रविंद्र बन्सीधर बहिर व सुधाकर भानुदास धुरंधरे यांनी ज्ञानराधा मल्टी स्टेस्टमध्ये आपल्या ठेवी ठेवल्या होत्या. ठेवींवर आकर्षक व्याज परतावा दिला जाईल असे सांगण्यात आले होते. परंतु ठेवींचा कालावधी पुर्ण होऊन सुद्धा ठेवी व त्याचा लाभ मिळालेला नाही. अध्यक्षांसह उपाध्यक्ष व इतरांनी फसवणूक केली. मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुरेश कुटे हे मागील ७ महिन्यापासून फरार आहेत, फक्त ऑनलाईन व्हिडिओद्वारे समोर येतात व तारीख देतात. परंतु सुरेश कुटे यांनी दिलेल्या तारखेला कधीच पैसे वाटप केले नाही. तिन्ही ठेवीदारांनी पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यासाठी गेले परंतु तेथे गुन्हा दाखल करुन घेतला नाही. त्यामुळे वळे, बहिर व धुरंधरे यांनी ॲड. अविनाश गंडले यांच्या मार्फत जिल्हा न्यायालयात धाव घेतली. ॲड. गंडले यांच्या युक्तिवाद ग्राह्य धरून ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट सोसयटीच्या संचालक मंडळासह अधिकाऱ्यांवर तीन प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिवाजी नगर पोलिसांना अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस.टी. डाेके यांनी दिले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!