8 C
New York
Thursday, April 3, 2025

Buy now

spot_img
spot_img

भगवान महाराज महाविद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायमः 92% निकाल

★आठ्ठेगाव-पुठ्यात भगवान महाराज महाविद्यालय आघाडीवर

कुसळंब | अतुल शेलार 

पाटोदा तालुक्यातील संत भगवान बाबा यांची जन्मभूमी सावरगाव घाट येथील भगवान महाराज कनिष्ठ महाविद्यालयाने गेली अनेक वर्षाची उज्वल यशाची परंपरा कायम राखली असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी/ मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळावरून जाहीर झाला असून महाविद्यालयांमधून कु.सानप राधा संजय हिने 80.67% गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
कु.मिसाळ मंगल संजय 77.83%
कु. सानप शितल नाना 76.67%
कु.बडे आकांक्षा नारायण 76.67% गुण मिळवून द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे.
कु. खाडे दीक्षा लक्ष्मण 76.17%
कु. खाडे वैष्णवी नामदेव 72.67%
कु.शिंदे प्रियंका शांतीलाल 74.17%
चि. पाखरे संकेत विष्णू 71.17%
कु. सानप सुनिता सुखदेव 70.00%
हे विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य बी.टी.खाडे प्रा.जायभाये सर प्रा.आघाव सर प्रा.चाटे सरांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे.
महाविद्यालयाचा निकाल 92% लागला असून यशस्वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळा संस्थापक अध्यक्ष माननीय रामकृष्ण बांगर साहेब सचिव सौ सत्यभामाताई बांगर युवा नेते विजयसिंह बाळा बांगर गावचे सरपंच संदेश सानप माजी सरपंच रामचंद्र सानप सर ग्रामपंचायत सदस्य, पालक , गावातील युवा वर्ग शाळेतील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी बांधव यांनी अभिनंदन केले असून पुढील शिक्षणास शुभेच्छा दिल्या आहेत.

★मुलगी शिकली पाहिजे यासाठी महात्मा फुलेंनी शर्तीचे कृतिशील प्रयत्न केले होते

आज खऱ्या अर्थाने त्याकाळी उभारलेला मोठा लढा प्रत्यक्षात साकार झालेला दिसत आहे. मुलगी शिकली तर कुटुंब सुधारेल कुटुंब सुधारलं तर समाजसुधारेल आणि समाज सुधारला तर देश घडेल असा विचार घेऊन फुले दांपत्यांनी स्री शिकली पाहिजे या गोष्टीवर भर दिला होता. आज या निकालामधून मुलींचे वर्चस्व पाहून महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्वप्न साकार साकार झाल्याचे नक्कीच पाहायला मिळाले. या भगवान महाविद्यालय मधून प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांत मुलींची संख्या अधिक आहे.यशवंत ठरलेल्या गुणवंतामध्ये मुलींची प्रचंड चिकाटी जिद्द आत्मविश्वास मेहनत कष्ट आणि अभ्यास करून हे यश त्यांनी संपादन केले असून आपला दबदबा कायम ठेवला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!