[ बीड जिल्ह्यातील सर्व जाती धर्मातील नागरिकांनी कुसळंबकरांच्या एकोप्याचा आणि निष्ठेचा आदर्श घ्यावा! ]
पाटोदा तालुक्यातील अगदी मेन व मोक्याचं गाव कुसळंब गाव म्हणून तालुक्याभर नव्हे तर जिल्हाभर प्रचलित असणारे गाव कुसळंब गाव आहे .येथील संस्कृती इतर गावांपेक्षा आगळी-वेगळी आहे. अगदी शिव-शाहू-फुले-आंबेडकर-संत तुकाराम महाराज-संत तुकडोजी महाराज-संत गाडगेबाबा-संत वामनभाऊ-राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या विचारासी नाळ जुळलेली पाहायला मिळते. सांगण्याचे तात्पर्य असे आहे की कुसळंब हे गाव विविधतेने नटलेल्या असून येथील लोकांची मानसिकता विविध पद्धतीची जरी असली तरी संस्कृती मात्र माणुसकीला धरून आहे. काही षडयंत्री लोकांनी स्वार्थासाठी आपलीशी करण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी लोक या संस्कृती प्रमाणेच वागतात. त्याचे उदाहरण सांगायचं म्हटलं अनेक जाती धर्माचे लोक किंवा अनेक विचाराचे लोक येथे राहत असताना. येथे प्रत्येकाचे सुख असेल किंवा दुःख असेल येथील जाणता प्रत्येकाच्या कार्यक्रमात तेवढीच मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र येऊन. सुख दुःख वाटून घेते.हे कोणीही ना करू शकत नाही. आजचे उदाहरण सांगायचे म्हटले तर एक मुस्लिम समाजातील शेख कुटुंबीयांचा विवाह सोहळा अमळनेर येथे पार पडला. तर त्या लग्न सोहळा प्रसंगी या गावातील प्रत्येकी घरातील एक किंवा दोन व्यक्ती मोठ्या प्रमाणावर लग्नामध्ये हजेरी लावताना दिसत होती ही समाजीक बांधीलकी जपताना आस पास गावांना दिसत होते. एवढेच नव्हे तर गावामध्ये अनेक जाती धर्माचे सुख आणि दुःख असतात तर संपूर्ण गाव त्या सुखा आणि दुःखामध्ये समाविष्ट होत असते हेच या कुसळंब गावचे वैशिष्ट्य आहे..कुसळंब गाव मध्ये अनेक प्रकारचे राजकीय पुढारी देखील आहेत परंतु इलेक्शन झाल्याच्या नंतर ते एकत्रितपणे एकमेकाप्रती नैतिकता बाळगून चहा पाण्याच्या निमित्ताने संवेदनशील वागतात.. नक्कीच थोडेफार अविवेकी आढळतात परंतु येथील संस्कृती त्यांना पण जपावीच लागते ही वास्तविकता कुणालाही नाकारता येणे अशक्य आहे. हा लेख लिहिताना सध्याची राजकीय परिस्थिती जाती द्वेष गुंडगिरी हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे कारण की राजकीय नेते शांतता ठेवू इच्छित नाहीत पण सर्वसामान्य नागरिकांनी मनावर घेतलं तर सर्व व्यवस्थित होईल हाच हीच संकल्पना घेऊन हा लेख लिहिला आहे तरी सर्व जाती धर्मातील लोकांनी एकोप्याचा संदेश कसा देता येईल यासाठी प्रयत्न करावेत हीच अपेक्षा आहे.
★निवडणुकीनंतरचा एकोपा!
गाव पातळीवरून जिल्हा पातळीपर्यंत ज्या ज्या निवडणुका होतात त्या त्यावेळी सर्व आपापल्या पक्षाची बाजू प्रबळपणे मांडतात परंतु निवडणूक झाल्याच्या नंतर सर्वजण एका जागेवर येऊन एकमेकाचा चहा पिऊन एकोप्याचा संदेश देतात हीच कुसळंबकरांची वेगळी ओळख आहे.
★जातीपाती सह धर्माच्या पलीकडे जाऊन कुसळंबकरांचा एकोपा!
कुसळंब येथील मुस्लिम कुटुंबीयातील शेख यांच्या मुलीचा विवाह सोहळा अंमळनेर येथे संपन्न झाला. याप्रसंगी गावातील सर्व जाती धर्मातील लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकोप्याचं आणि माणुसकीचे दर्शन घडवून आणले. धर्म आणि जात ही कुसळंबकरांसाठी खूप दूरची गोष्ट आहे. कारण की कुसळंब मध्ये सर्व जाती आणि धर्माचे लोक एकोप्याने राहून माणुसकीचे दर्शन घडवतात हा आदर्श जिल्हाभरातील सर्वच जाती धर्मातील नागरिकांनी घेतला पाहिजे आणि एकोप्याने राहिले पाहिजे…
★महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारा सध्याचा जातीभेद!
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्याचबरोबर आदर्शवादी महापुरुष आणि देशाला दिशा देणारे महापुरुष देखील महाराष्ट्रात घडले आहेत, पण त्याच महाराष्ट्रात सध्याच्या लोकसभेच्या अनुषंगाने सुरू असलेला जातीभेद हा निंदनीय असून महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणारा आहे. पण हाच जातीभेद, हुकूमशाही, गुंडगिरी दडपशाही, संपवण्यासाठी देखील याच महाराष्ट्रातील शूरवीर आणि विचारवंत घडले आहेत हे देखील आपल्याला विसरता येणार नाही. त्याच पद्धतीने सध्याचा जातीभेद, दडपशाही, झुंडशाही मुक्त करण्यासाठी असंच कुणीतरी पुढे येईल यातही मनात शंका येण्याचे कारण नाही. आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्रातील जनता डोक्यावर सुद्धा घेईल..
– अतुल शेलार
सामाजिक कार्यकर्ते, कुसळंब.