भारतातील सर्वोच्च कार्य करणारे महापुरुष भारतरत्न पुरस्कारापासून वंचितच ?
देशातील तमाम शेतकरी आणि कष्टकरी कामगार त्याचबरोबर अडाणी समाजासह संपूर्ण बहुजन समाज अज्ञानाच्या अंधारात खीतपत ठेवणारी समाज व्यवस्थेला मूठ माती देऊन एक नवं विवेकी समाज घडवण्याचं काम करणारे त्या काळाचे खरेखुरे समाज सुधारक तथा विचावंत क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले हेच ठरतात.
मी त्यांच्या महान कार्यावर थोडक्यात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्या महाराष्ट्रातील महान थोर संतांच्या अभंगा प्रमाणेच महात्मा फुले यांचे सुद्धा काव्य रचनेला आजही तोड नाही. बहुजन वर्गाने चांगले शिक्षण घेणे म्हणजे तारेवरची कसरतच करावी लागत होती तेव्हा ब्रिटिश सरकार च्या काळात म्हणजे 1882 मध्ये हंटर कमिशन पुढे सर्वांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळावे यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर आग्रह धरला होता यावरून त्यांच्या विचार किती दूरदृष्टी होती हे जाणवते आहे..महात्मा फुले यांनी वैचारिकता , समता ,स्वातंत्र्य , न्याय , बंधुता हे आत्मसात करून त्यांनी अस्पृशता निर्मूलन, जातीभेदता या संदर्भात त्यांचे प्रचंड मोठे योगदान आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोध घेण्याबरोबरच भारतातली पहिली शिवजयंती सन 18 69 साली हिराबाग पुणे येथे महात्मा फुलेंनी साजरी करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर महाराजांवरील पहिला पोवाडा लिहून महाराजांची विचाराची प्रेरणा परत नव्याने बहुजनाच्या मनात निर्माण केली.आज्ञानाच्या अंधारामध्ये अडकलेला बहुजन समाज ज्ञानाच्या प्रकाश झोतात आणण्याचं काम त्यांनी जीवनभर केले. अस्पृश्यतेच्या विरोधात कृतिशील आंदोलन उभे केले स्वतःच्या घरातील पाण्याची विहीर अस्पृश्यतांसाठी खुली केली त्याचबरोबर विधवा पुनर्विवाह,आंतरजातीय विवाह,जातीअंतीचे अनेक उपक्रम राबवले. त्याचबरोबर चार भिंती मध्ये बंदिस्त असलेले महिलांना मुक्तीचा आश्वास घेण्याचा अधिकार दिला, स्त्रि शिकली पाहिजे यासाठी भरीव कामगिरी केली, शेतकरी कष्टकरी कामगार यांच्या संदर्भात ब्रिटिशांकडे कायदे करण्याची मागणी केली. अनेक अनिष्ट रूढी परंपरा बंद करण्याची मागणी देखिल त्यांनी इंग्रजाकडे करून कायद्यात रूपांतर करण्यास भाग पाडले. आज पण आपल्या भारतीय संविधानात महात्मा ज्योतिराव फुले यांचा विचाराचा बराच सार पाहायला मिळतो. त्याचबरोबर भारतातली पहिली कामगार संघटना उभी करून शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्यासाठी दिनबंधू वृत्तपत्र उभे केले. ( सहकारी मित्र कृष्णराव भालेकर यांच्या साह्याने) तसेच जनता जागृत झाल्यावर जनतेनेच सभा बोलावून 11 मे 1888 रोजी ज्योतिराव फुलेंना बहुजन समाजाने ‘महात्मा’ ही पदवी बहाल केली.त्यामुळे एकमेव कृतिशील समाजसुधारक व विचारवंत ठरतात. एवढंच नव्हे तर अनेक पद्धतीचे साहित्य लिहून सत्यशोधक चळवळ उभा केली. अनेक खूप असे महान कार्य त्यांनी केले तरी देखील इथलच्या या व्यवस्थेने अजूनही त्यांच्या कार्याला सन्मानित केले नाही हीच तर मोठी शोकांतिका आहे.. भारत देशाचे पंतप्रधान बीड येथे मतदानासाठी येऊन बोलतात आम्ही ओबीसी व अनुसुचित जाती वर अन्याय होऊ देणार नाही मग बहुजन समाजातील महा पुरुष अजून ही सन्मानित का नाहीत हा अन्याय नाही का? का फक्त मतासाठी बोलता ? असा प्रश्न तमाम जनतेच्या मनात उपस्थित होतो आहे.. सचिन तेंडुलकर, लालकृष्ण अडवाणी, एम एस स्वामीनाथन, प्रणव मुखर्जी, लता मंगेशकर, भीमसेन जोशी, मदन मोहन मालवीय, आचार्य विनोबा भावे असे अनेक आहेत यांना न मागता सहज भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करता आणि इकडे बहुजन वर्गातील महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरनोत्तर तरी सन्मानित करावं अशीच संपूर्ण भारत देशातील नागरिकांची मागणी असून देखील त्यांना न्याय देण्याचं काम अजून तरी या व्यवस्थेने व या सरकारने केलेलं नाही.
– अतुल शेलार
सामाजिक कार्यकर्ते, कुसळंब.
मो.9637376865