देशाचे प्रधानमंत्री यांच्यामध्ये मराठा समाजाबद्दल इतका द्वेष का ?
अंबाजोगाईतील सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कडून छत्रपतींचा साधा उल्लेख देखील नाही पण मराठ्यांचा द्वेष उघड उघड दिसला
बीड | प्रतिनिधी
बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी साहेब अंबाजोगाई येथे आले होते. सभेला संबोधित करताना मोदी साहेबांकडून साधा छत्रपती शिवरायांचा उल्लेख तर नाहीच नाही पण मराठा समाजाबद्दलचा द्वेष उघड उघड दिसून आला. अंबाजोगाई येथे झालेली सभा होती का मराठ्यांचा द्वेष करणारी सभा होती हाच प्रश्न बीड जिल्ह्यातील मराठा समाजामध्ये उपस्थित होताना दिसत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रधानमंत्री यांनाच प्रश्न विचारले जात आहेत आणि त्यांना सांगितले ही जात आहे की आता एससी, एसटी, ओबीसी आरक्षण नाही आता तुम्हालाच हटवणार अशा पद्धतीचा मराठा समाजाकडून एल्गार येताना दिसत आहे.
मराठा बहुल मतदारसंघांमध्ये ओबीसी चे उमेदवार देऊन मतदान देखील घ्यायचं मराठ्यांचे नेते कामाला लावायचे मात्र मराठा समाजाचा द्वेष इतका व्यक्त करायचा की त्यांना घरकणा घाट का करण्याची परिस्थिती येईल अशी परिस्थिती करून ठेवायची असंच काहीसं अंबाजोगाई येथे झालेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेवरून चित्र स्पष्ट झाले आहे. बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा प्रचारासाठी बीड जिल्ह्यातील सर्वच मराठा समाजाचे विद्यमान आजी-माजी आमदार पायाला भिंगरी लावून पळत असतानाच अंबाजोगाईच्या सभेत मराठ्यांचा उघड उघड अपमान केल्याचं दिसत असताना देखील मराठ्यांच्या नेत्यांकडून एक प्रकार शब्द देखील व्यक्त होताना दिसत नाही ही मोठी शोकांतिका आहे आता मराठा समाज 13 तारखेला ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही अशाच प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहे.
★फडणवीस यांना जाणून-बुजून डावल!
अंबाजोगाई येथे झालेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाणून-बुजून दाबाल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. सोशल मीडियावर दबक्या आवाजात असं म्हटलं जात आहे देवेंद्र फडणवीसच बीडची जागा पाडण्यासाठी सक्रिय झाल्याचं दिसत असल्यामुळे त्यांना सभेला येण्यापासून रोखले आहे, अशा चर्चा सोशल मीडियावर ऐकायला येत असल्याने चर्चेला एकच उधाण आले आहे.
★उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्टेजवर न दिसल्याने बीडची जनता नाराज
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अंबाजोगाई येथील स्टेजवर न दिसल्यामुळे भाजपमधील गटबाजी उघड उघड दिसून आली. बीड जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न दिसल्यामुळे नाराज झाल्याचा सुद्धा ऐकायला मिळत आहे. या नाराजीचा फटका पंकजाताईला बसेल का ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
★मोदींकडून मराठा द्वेष दिसला
बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई येथे झालेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीतील सभेत मराठा समाजाबद्दल चा द्वेष हा उघड उघड दिसून आल्याचे चित्र असल्याने त्याचा परिणाम मतदानावर होणार यात तीळ मात्र शंका नाही असेही सोशल मीडियावर बोलले जात आहे.