★महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे साठी शिवसेना सक्रिय!
पाटोदा | प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने पाटोदा तालुक्यामध्ये डोर टू डोर प्रचार सुरू केला आहे. बुधवारी शिवसेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी सकाळी सकाळी पाटोदा शहरांमध्ये मतदारांच्या डोर टू डोर भेटी घेतल्या आणि मतदान करण्यासाठी आव्हान केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बापा सोनवणे यांच्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोरदार प्रचार सुरू केल्याचे दिसत आहे पाटोदा तालुक्यामध्ये तालुकाप्रमुख मुकुंद शिंदे यांनी पक्षाची मोर्चेबांधणी करत सर्वच कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जोरदार काम करण्याचे आव्हान केले आहे तर आज बुधवार सकाळी जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी पाटोदा शहरांमध्ये डोर मतदारांच्या भेटी घेऊन बजरंग सोनवणे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी आव्हान केले यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मुकुंद शिंदे, युवासेना प्रमुख अजिंक्य डोरले, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवभूषण जाधव, शेतकरी नेते गणेश कवडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष राहुल जाधव, शेतकरी कामगार पक्षाचे तालुकाध्यक्ष विष्णुपंत घोलप, अल्पसंख्यांक तालुका फारुख खाजा, किसान सेल तालुका प्रमुख रामेश्वर नागरगोजे, पॅंथर सेनेचे तालुकाध्यक्ष अनंत जावळे, सोमनाथ लवूळ, शेतकरी सेनेचे तालुका उपाध्यक्ष अशोक बापू घोशीर यांच्यासह पाटोदा तालुक्यातील सर्व महाविकास आघाडी घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.