★निधी येतो बीड जिल्ह्याच्या विकासासाठी पण तोच निधी वापरला जातो फक्त परळीसाठी
बीड | प्रतिनिधी
बीड जिल्ह्याचे नेते म्हणजे नाव मोठे लक्षण खोटे लाजिरवाणी गोष्ट ही अभिमानाने सांगतात की बीड जिल्हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा आहे.गेले कित्येक वर्ष बीड जिल्ह्याच्या विकासाच्या नावाखाली जनतेला फसवणार आहात गेले कित्येक वर्षे बीड जिल्ह्याची रेल्वे येत आहे परंतु अजूनही काम अर्धवटच आहे बीड जिल्ह्यामध्ये कुठलीही एमआयडीसी नाही त्याच्यावर कोणी बोलत नाही बीडमध्ये कुठले उद्योगधंदे नाहीत. त्याच्यावर कोणी बोलत नाही. बीडमध्ये कुठले आयटीआय कॉलेज नाही बीडमध्ये कुठलेही मेडिकल कॉलेज नाही याच्यावर एकही नेता बोलायला तयार नाही, परंतु फक्त विकासाच्या गप्पा मारल्या जात आहेत आणि जातीपातीचे राजकारण करून निवडणुका जिंकल्या जातात विकास मात्र कुठेच झालेला नाही आणि सर्व नेते एका मांडीला मांडी लावून बसत आहेत म्हणून यांना विचारणार ही कोणी राहिलेला नाही त्यामुळे विकास हवा तर पर्याय नवा असंच बीड जिल्ह्याच्या जनतेने ठरवायला हवा बीड जिल्ह्याने अनेक नेते घडवले आहेत परंतु बीड जिल्ह्यासाठी कोणीही विकासाचं काम केलं नाही.एक एका घरांमध्ये वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षे खासदारकी आमदारकी असून सुद्धा बीड जिल्ह्यासाठी काही करता आला नाही या उलट हा जिल्हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा आहे म्हणून हेच लोक ओरडून सांगतात परंतु या ऊस तोड कामगारासाठी शेतकऱ्यांसाठी एकही नेता पुढाकार घेत नाही त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये बीडच्या जनतेने या सर्व नेत्यांना यांची जागा दाखवणे आवश्यक आहे जोपर्यंत घराणेशाही संपत नाही तोपर्यंत बीड जिल्ह्याचा विकास होणार नाही त्यामुळे बजरंग बाप्पाच्या रूपाने बीड जिल्ह्याला नवीन एक चेहरा मिळाला आहे त्यामुळे बजरंग बाप्पा सोनवणे ला सहकार्य करून येणाऱ्या लोकसभा निवडणूक मध्ये बदल घडवावा असं मत सामाजिक कार्यकर्ता संतोष दादा पवार यांनी व्यक्त केल आहे.