★पाटोदा तालुक्यातील शेतकरी बांधव बजरंग बाप्पांच्या विजयाचे साक्षीदार होणार
पाटोदा | प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील शेतकरी इंडिया महाविकास आघाडीच्या बाजूने मत करणार असे शेतकरी नेते गणेश कवडे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकार द्वारे सांगितले. भाजप सरकारच्या काळामध्ये शेतकरी आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे खचला आहे खताचे भाव गगनाला पोहोचले परंतु मालाचे भाव कमी करून शेतकऱ्यावर एक प्रकारे अन्याय केला कांदा या पिकाला निर्यात बंदी केली, सोयाबीनचे भाव वाढू नयेत याची प्रमाणिक काळजी घेतली, डिझेल 60 रुपयावरून 100 वर नेले याचा परिणाम शेतकऱ्याच्या आर्थिक नियोजनावर झाला. नांगरट 1200 वरून 2000 भाव झाला शेतात पाळी घालण्यासाठी 400 रुपये एकरी वरून 1000 रुपयांवर गेली, पेरणी 700 वरून 1500 वर गेली, महिलांसाठी गॅस टाकीची योजना आणून प्रत्येक घरामध्ये गॅस टाकी दिली आणि त्याचा भाव 400 वरून 1100 नेला, दैनंदिन जीवनामध्ये जीवनावश्यक लागणाऱ्या वस्तूवर जीएसटी बसवली, सोन्याचा भाव 40000 वरून 78000 वर गेला शेतकऱ्यांना मुला बाळांच्या लग्नामध्ये सोनं घेणं अशक्य झालं हे सरकार शेतकऱ्याच्या बाजूच नसून भांडवलदार लोकांच आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी निर्णय घेतला इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्यावर मताचा पाऊस पडणार असे शेतकरी नेते गणेश कवडे यांनी सांगितले.
★बाप्पांच्या विजयासाठी शेतकरी नेते गणेश कवडे शेतकऱ्यांच्या भेटीला
पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक पवित्रा घेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने रस्त्यावर असणारे शेतकरी नेते गणेश कवडे हे बजरंग सोनवणे यांच्या विजयाचे पाटोदा तालुक्यातील शेतकरी साक्षीदार व्हावेत यासाठी शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी आणि बजरंग बाप्पा यांच्यावर शेतकऱ्यांना मतांचा पाऊस पाडण्यासाठी प्रयत्न करत असून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून बजरंग बाप्पांना निवडून देण्यासाठी आव्हान करत आहे.