लोकशाही मध्ये विरोधी पक्ष प्रचंड महत्त्वाचा!
मस्तावलेल्या आणि माताळलेल्या जनावरांना येसन काबू करण्याचं काम करते, अगदी त्याच प्रमाणे सत्तारुड पक्षाच्या लोकांचे डोके ठिकाण्यावर आणण्याचे काम विरोधी पक्षासह पत्रकार आणि सर्वसामान्य जनता करत असते. सक्षम विरोधी पक्ष मांडणाऱ्या व्यक्तीला जनतेने डोक्यावर घेतले पाहिजे. त्यांची ताकद वाढवली पाहिजे, तर सर्वसामान्याला चांगल्या पद्धतीने न्याय मिळू शकतो. अन्यथा आंधळ दळत आणि कुत्र पीठ खात या पद्धतीने अवस्था सर्वसामान्य नागरिकांची होईल यात तीळ मात्र शंका नाही..जर लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष सक्षम भूमिका बजावणारे नसेल तर ,ती लोकशाही परिपक्व होत नाही.
लोकशाहीला पोषक असते ते विरुद्ध पक्ष भूमिका बजावणारे. विरुद्ध पक्ष हा कायदा संसदेमध्ये तयार केला गेला आहे तरी 16 व्या लोकसभेमध्ये आणि चालू लोकसभेमध्ये विरोधी पक्ष पद रिक्त असल्यामुळे प्रचंड त्रासाला आणि दडपशाहीला सर्वसामान्य जनतेला सामोरे जावा लागते हे सर्व आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. विरोधी पक्षाचे किंवा सर्वसामान्यांची भूमिका मांडणाऱ्यांचे काम फक्त टीका करणे नाहीतर विकास कामांमध्ये एकत्र येऊन करायचे पण असते. हेच तर लोकशाहीला अभिप्रीत असते. दैनंदिन जीवनाच्या कामकाजात सर्वसामान्यांच्या हिताच्या गोष्टी घडल्या पाहिजेत त्यासाठी सत्ते विरोधी भूमिका घेणाऱ्यांना सुद्धा जनतेने मोठ्या प्रमाणावर मोलाचे सहकार्य केले पाहिजे. तरच सत्तारूढंच्या कामांमध्ये क्वालिटी निर्माण होईल आणि चांगल्या कामात मध्ये भर पडत असते. सत्तारूढंच्या खराब ,असंविधानिक कामकाजावर अंकुश ठेवणारा व चिकित्सा करणारं, प्रतिप्रश्न विचारणारं, लोकांच्या समस्या सोडण्यासाठी प्रशासन किंवा सरकार दरबारी दाद मागणारं या सर्व जबाबदाऱ्या विरोधी पक्ष , पत्रकार आणि सर्वसामान्य जनता यांच्या आहेत. हे आता आपण समजणे महत्त्वाचे आहे. येणाऱ्या काळामध्ये कधीही विरोधी पक्ष पद हे कमजोर होता कामा नये यासाठी सुद्धा जनतेने खबरदारी घेणे अतिशय महत्त्वाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल. आणि लोकशाही टिकून राहील…
★दडपशाहीचे कारणे
1) मतदार जागृत नसल्याने शंभर टक्के मतदान न होणे.
2) दर पाच वर्षाला सत्ता परिवर्तन न होणे..
3) निवडणुकीमध्ये सुशिक्षित उमेदवाराला निवडून न देता गुंड प्रवृत्ती आणि पैशाच्या जोरावर निवडणूक लढवणाऱ्याला निवडून देणे..
5) भ्रष्टाचार करणाऱ्याला सहकार्य करणे आणि डोळे झाक करून पाहत राहणे…
याच कारणांमुळे हुकुमशाही कडे वाटचाल सुरू आहे त्याला कारणीभूत सर्व भारतातील नागरिक आणि मतदार आहेत .चला तर मग आपण निर्भय बनवूया आणि विवेकी ,संविधानिक समाज घडवू या …
लेखक:- अतुल शेलार
सामाजिक कार्यकर्ते कुसळंब.