★सरगम बॅन्जो व हलगी पथक,भव्य चेडे पथक, मर्दानी खेळ
आष्टी | प्रतिनिधी
थोर समाजसुधारक, विचारवंत, समाजातील विविध अनिष्ट प्रथा दूर करण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं असे क्रांतीसुर्य म. ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त म.फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने आष्टी शहरात म.फुले जयंती मिरवणुकीत भव्य शोभायात्रा, सरगम बॅन्जो व हलगी पथक कर्नाटकचे पारंपारिक वाद्य,भव्य चेडे पथक, मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिके, कसरती झाल्या. क्रांतीसूर्य म. ज्योतिबा फुले यांनी सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन आणि स्त्रियांना आणि मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य केले.आजच्या आधुनिक विचारांच्या साक्षर समाज निर्मितीमध्ये त्यांचे अमुल्य योगदान आहे त्यामुळे त्यांची जयंती यंदा आष्टी तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली. दि.७ एप्रिल रोजी रक्तदान झाले.या शिबीरात मोठ्या प्रमाणावर रक्तदात्यांनी रक्तदान केले.महात्मा फुले जयंतीनिमित्त सकाळी आष्टी शहरातील म. फुले चौकात फुलेंच्या पुतळ्याला अभिवादन करुन भव्य मोटारसायकल रॅली निघाली. सालेवाडी येथे पोहचून तिथे फुले यांना अभिवादन करुन आष्टी शहरात समारोप झाला. आष्टी येथे सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९७ व्या.जयंती उत्सवानिमित्त रविवार दि.७ एप्रिल रोजी संत सावतामाळी मंदिरात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. गुरुवार दि.११ एप्रिल रोजी सोलेवाडी ते आष्टी अशी भव्य महिलांची मोटार सायकल रॅली सकाळी संपन्न झाली.सकाळी १० वा.आ.सुरेश धस,आ.बाळासाहेब आजबे, माजी आ.भीमराव धोंडे, तहसीलदार प्रमोद गायकवाड, विजय गोल्हार, डाॕ.शिवाजी राऊत, अशोक साळवे, युवानेते महेश आजबे, नगराध्यक्ष जिया बेग, उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे, किशोरमामा झरेकर ,नगरसेवक ज्ञानदेव राऊत, सुनिल रेडेकर, यशवंत खंडागळे, बाळासाहेब बोरूडे,जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे ,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे, विठ्ठलराव बन्सोडे,प्राचार्य डॉ.सोपान निंबोरे,पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण पोकळे,गणेश दळवी,संतोष सानप, खंडूदादा जाधव,सुनील रेडेकर, रत्नदीप निकाळजे, सरपंच अशोक मुळे,किशोर झरेकर आदी सामाजिक,राजकीय, धार्मिक, व्यापार क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा गुरुवार दि.११ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ४ ते १० पर्यंत भव्य शोभायात्रा झाली.या शोभायात्रेत सरगम बॅन्जो व हलगी पथक तसेच कर्नाटकचे पारंपारिक वाद्य,भव्य चेडे पथक सायंकाळी ४ ते १० यावेळात प्रात्यक्षिके झाले.संगमनेर येथील सुप्रसिद्ध मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिकेसुध्दा झाली.