6 C
New York
Tuesday, April 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

वादळी वाऱ्यासह पाऊस अर्धा तास गारपीट!

★फळबागासह उन्हाळी पिकांचे नुकसान ; नदी नाल्यांना पाणी वाहिले

धारूर | प्रतिनिधी

तालुक्यात गुरुवारी दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामध्ये अर्धा तासझालेल्या गारपिठीचा सात ते आठ गावांना तडाखा बसला. यामुळे अंबा,डाळिंब, चिंच या फळ पिकांसह उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने हाहाकार उडाला होता.
तालुक्यात गुरुवारी दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाच्या दरम्यान आंबेवडगाव, सोनीमोहा, चोंडी, जहांगीरमोहा, धनकवाड, थेटेगव्हाण, चोरांबा, अरणवाडी, पहाडी पारगाव या गावच्या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात गारपिठ झाल्यामुळे अंबा, डाळिंब या फळ पिकासह मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाळी भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली होती. काढणी केलेल्या ज्वारी, गहू, हरभरा पिके उघड्यावर असल्याने शेतामध्ये पूर्णपणे भिजवून गेले आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे शेतातील आणि घरावरील पत्रे उडाल्याने हाहाकार उडाला होता.सोनीमोहा येथे अचानक नात्याला पूर आल्यामुळे काही अंतर ट्रॅक्टर वाहून गेली होते. ते शेतकऱ्यांनी थांबवले.अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून पडले आहे.पावसादरम्यान झालेल्या विजेच्या धक्क्यामुळे सोनीमोहा येथे दोन शेळ्यांचा मृत्यू झाला. रेशीम साठी उभारण्यात आलेले शेड वरील पत्रही उडून गेले होते. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत.रेशीम साठी उभारण्यात आलेले शेड वरील पत्र हीउडून गेले होते.पाऊस आत असलेल्या घरांचा मारा पक्षांना लागल्यामुळे पक्षाचा मृत्यू झाल्याची दिसून येत होते.

★अर्धा तास गारपीट

गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू झाला होता . यादरम्यान वादळी वारे सुरू होते . .यावेळी अचानक गारपीट सुरू झाली . ही गारपीट अर्धा तास सुरू होती . अचानक झालेला गारपिठीच्या पावसामुळे शेतात उघड्यावर असलेल्या पशुधनांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते.

★पंचनामाच्या सूचना

तालुक्यात अनेक गावांमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकाचे तसेच घराचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तलाठी , मंडळअधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
– जीवनकुमार कांबळेत, हसीलदार धारूर.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!