पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यात चुरशीची लढत
★बजरंग सोनवणे, ज्योती मेटे, अशोक हिंगे रिंगणात आल्याने पंकजा मुंडेंसाठी एकतर्फी निवडणूक ?
बीड | सचिन पवार
लोकसभा निवडणुकीचा रणसिंग फुंकले आणि बीड लोकसभेला अचानक विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापण्यात आले आणि त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांना खासदारकीचे तिकीट मिळाल्याने अनेकांनी भवाया उंचावल्या होत्या. त्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र गटाची उमेदवारी कोणाला मिळणार यावरही बरेच दिवस गेले आणि बजरंग सोनवणे यांना राष्ट्रवादीचे तिकीट फायनल झालं लागलीच ज्योती मिळते अपक्ष उभय राहण्याच्या तयारीत आणि वंचित कडून अशोक हिंगे यांची उमेदवारी जाहीर एकूणच बीडचा राजकारण कुठे चालले हे कुणालाच सांगता येणार नाही परंतु जनता वेट अँड वॉच भूमिकेत अजून सुद्धा आहे.
निवडणूक जरी नेत्यांची असली तरी यावेळेस जनतेने हातात घेतली आहे कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला पाडायचं हे तेच ठरवणार आहेत. निवडणूक भावनिक नसून निवडणूक स्वाभिमानाची झाली आहे. विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे बीडच्या लोकसभा निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. खऱ्या अर्थाने बीड लोकसभेला उभा राहिलेल्या उमेदवारांपैकी भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांच्यातच लढत होणार असल्याचं सध्याचं तरी चित्र असलं तरी शेवटी काय बदल होईल ते आत्ताच सांगता येत नाही. जनता काय निर्णय घेईल त्यावर बीडच राजकारण ठरणार आहे. जनतेने ठरवलं तर काहीही होऊ शकतं त्यामुळे सध्या बीड लोकसभेचे भाकीत करण हे हास्यास्पद होऊ शकतो त्यामुळे भाकीत न करता जनतेच मत काय असेल हे लवकरच कळेल तोपर्यंत वेट अँड वॉच भूमिका जनतेला नव्हे नेत्यांनाच घ्यावी लागणार आहे.
★खरी लढत पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यातच!
बीड लोकसभेला चार उमेदवार जरी रिंगणात येणार असले तरी खरी लढत ही भाजपचे उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यातच रंगणार आहे. तसेच मतदार कोणती भूमिका घेतात हे सुद्धा अद्याप गुलदस्त्यातच आहे कारण की बीडचा राजकारण सध्या खूपच गरम झाल आहे.
★तर पंकजा मुंडेंसाठी एकतर्फी निवडणूक!
बीड लोकसभेला पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे ज्योतीताई मेटे अशोक हिंगे हे उमेदवार रिंगणात उतरल्याने पंकजा मुंडे यांच्यासाठी बीड लोकसभा एकतर्फी होण्याची शक्यता आहे. चौरंगी लढत झाली तर पंकजा मुंडे एकतर्फी निवडून येतील यातील मात्र शंका नाही.
★जादूची कांडी आणि बजरंगी गदा!
मुंडे घराण्याची बीड जिल्ह्यावरील पकड अनेक वर्षापासून जशी आहे तशीच आहे त्याला कारणही तसेच ठरलेलं आहे मुंडे साहेबांपासून पंकजा मुंडे पर्यंत जादूची कांडीची जादू चालू राहिली आहे पण बजरंग बली ची गदा सुद्धा चांगलीच ताकतवान झाल्याने यावेळेस जादूची कांडी आणि बजरंगी गदा यामध्ये चांगलीच रंगत रंगणार आहे.
★चौरंगी लढत झाली तर पंकजा मुंडे आजच विजयी!
पंकजा मुंडे, बजरंग सोनवणे, ज्योती मेटे, अशोक हिंगे अशी चौरंगी लढत झाली तर बीड जिल्ह्याच्या खासदार म्हणून पंकजा मुंडे आपल्याला पाहायला मिळू शकतात यात तीळ मात्र शंका नाही. चौरंगी लढत ही पंकजा मुंडेंसाठी फायदेशीर ठरणार आहे.