समाजासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणाऱ्या महामानवाची जयंती नाचून नाहीतर वाचून साजरी केली पाहिजे!
प्रचंड बुद्धिमत्ता असण्या सोबतच ती,समाजासाठी कशी उपयोगाची होईल त्याकरिता स्वतःचे संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्ची घालणाऱ्या महामानवाला जयंतीनिमित्त नाचून नाही तर वाचून अभिवादन केलं पाहिजे तरच बाबासाहेबांनी दिलेल्या विचाराचे आपण खऱ्या अर्थाने पाईप ठरू शकतो म्हणूनच येणारी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही नाचून नाहीतर वाचून साजरी करावी हीच अपेक्षा…!
त्यांनी आयुष्यामध्ये अनेक पदव्या मिळवल्या. आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचा उपयोग देशाच्या आणि समाजाच्या उधारासाठी केला जगाच्या पाठीवर एक असं व्यक्ती महत्त्व आहे. की त्यांच्यावर आख्या जगातले लोक रिस्पेक्ट ,प्रेम करतात कारण तेवढ मोठं आहे. त्यांनी 64 विषयांमध्ये मास्टरकी, 10 भाषेचे ज्ञान आत्मसात, 32 पदव्या, 60 पेक्षा जास्त देशांच्या संविधानांचा अभ्यास, अनेक धर्माचा अभ्यास, तसेच सर्वोत्कृष्ट भारतीय संविधानाचे निर्माते, उत्कृष्ट अर्थतज्ञ, उत्कृष्ट भाषातज्ञ. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानवशास्त्र या विषयाचे तज्ञ,
कायद्याच्या क्षेत्रातील सर्वोच्च पदवी बार ॲट लॉ पदवी प्राप्त करणारे, आदर्श नेता, कोलंबिया विद्यापीठातून शिक्षण घेऊन गेलेल्या विद्यार्थ्यांमधील सर्वात हुशार विद्यार्थी.. अशा अनेक प्रकारच्या महान कार्याविषयी आपल्याला या ठिकाणी बोलता येईल . त्यापैकी अजून एक महान कार्य म्हणजे. ‘मूकनायक ‘ 31 जानेवारी 1920 रोजी बाबासाहेबांनी मूकनायक हे पत्र सुरू केलं हे पत्र सुरू करण्याचा प्रमुख उद्देश शोषित वंचित तमाम गोरगरीब दिन दुबळ्या लोकांची व्यथा देशासमोर मांडण्याचा काम मूकनायक पत्राच्या माध्यमातून वास्तविकता दाखवण्याचं काम करत होते. त्याचबरोबर या महामानवानी शोषित वंचित बहिष्कृत दीनदुबळ्या गोरगरीब जनतेला एक मोलाचा संदेश दिला तो म्हणजे, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा… अशा अनेक देशहिताचे ,समाज हिताचे कार्य आपल्या डोळ्यासमोर सदैव जयंतीच्या माध्यमातून उभे राहिले पाहिजे. त्यासाठी आपण सर्व समाज बांधवानी एकत्र येऊन या महामानवाच्या विचाराची आचराची समचाराची जयंती साजरी करावी.. आजच्या आधुनिक युगामध्ये बऱ्याच ठिकाणी विचाराची आचाराची समचाराची जयंती पाहायला मिळते. जो समाज विचाराची जयंती साजरा करतो तेथील ठिकाणचे लोक जयंती मध्ये आपसात भांडण होत नाहीत, हातामध्ये कुठलाही प्रकारचे शस्त्र वापरत नाहीत. अजून कोणत्याही महापुरुषांच्या जयंती मिरवणुकीच्या वेळी मज्जित, चर्च, शाळा, मंदिर, अशा ठिकाणी आरडाओरडा करत नाहीत.. कधीही कुणा बद्दल द्वेष भाव बाळगत नाहीत.म्हणून आम्ही म्हणतो ह्यालाच तर विचाराची जयंती म्हणतात…!
याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ज्यांनी बाबासाहेब वाचले ती व्यक्ती प्रत्येकासोबत विवेकानेच वागत असते. त्यामुळे सर्व बांधवांनी बाबासाहेब वाचणे ही आता काळाची गरजच आहे, आणि महामानवाची जयंती सर्व जाती धर्मातील समाज बांधवांनी एकत्र येऊन जयंतीच्या माध्यमातून पुढच्या येणाऱ्या पिढीला एकोप्याचं व समानतेचा आदर्श दाखवावा…
– अतुल शेलार
सामाजिक कार्यकर्ते, कुसळंब.