6 C
New York
Tuesday, April 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

मराठा नेत्यांकडून खेकडा प्रवृत्तीचे पुन्हा दर्शन!

जरांगे पाटील तुम्हीच लक्ष द्या बरं!

★देवेंद्र फडणवीस मराठ्यांना बोटावर नाचू लागले आणि मराठे देखील ताल धरू लागले

बीड | सचिन पवार

बीड लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाकडून बजरंग बप्पा सोनवणे, वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे तर अपक्ष म्हणून ज्योतीताई मेटे रिंगणात उतरल्याचे जवळपास स्पष्ट झालेलं दिसत आहे. हे सर्व पाहिल्यानंतर सर्वसाधारण मराठा समाज खूप संतापलेला दिसत आहे. मराठा समाजातूनच तीन-तीन उमेदवार रिंगणात उतरणार असतील तर निवडून येतील कसे ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मग पुन्हा पंकजा मुंडेच खासदार होतील यात शंका नाही. मराठा समाजातील खासकरून नेत्यांमध्ये सुरू असलेली खेकडा प्रवृत्ती संपायचं नाव घ्यायला तयार नाही. मराठ्यांच्या नेत्यांनी खेकडा प्रवृत्ती सोडली नाही तर बीड जिल्ह्यातील मराठा समाज सरसकट नोटा मारून मराठ्यांच्या नेत्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मराठ्यांच्या नेत्यांनो शहाणी व्हा तिघेजण एकत्र बसा एकच तिकीट फायनल ठेवा अन्यथा तुम्ही तिघेही मराठ्यांचे मत विसरा असं सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजावर खेकडा प्रवृत्तीचा असलेला कलंक पुसण्याचे काम केलं आहे परंतु बीड जिल्ह्यातील नेतेमंडळींकडून पुन्हा एकदा खेकडा प्रवृत्तीचे दर्शन दिसल्याने सर्वसाधारण मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. भारतीय जनता पार्टी कडून पंकजा मुंडे खासदारकीच्या रिंगणात उतरले असून त्यांच्याविरुद्ध बजरंग बाप्पा ज्योतीताई मेटे अशोक हिंगे उतरल्याने पंकजा मुंडे एकतर्फी जिंकून येतील यात शंका उरली नाही. मग मराठा समाजाने केलेले लाखोंचे कोटींचे आंदोलन पुन्हा पाण्यात जाणार असं चिन्ह दिसत आहे परंतु सर्वसाधारण मराठा समाज जरांगे पाटलांना विनंती करत आहे बीड जिल्ह्यातील काही मराठे फडणवीसांच्या दावणीला बांधल्याने सर्वसाधारण मराठ्यांचे वाटोळ होणार आहे त्यामुळे तुम्हीच लक्ष घाला आणि अपक्ष उमेदवार द्या त्यांना निवडून आणायची जबाबदारी बीड जिल्ह्यातील लाखो मराठे येथील. पाटील तुमची मान खाली जाणार नाही याची बीड जिल्ह्यातील मराठी काळजी घेतील फक्त तुम्ही अपक्ष उमेदवार बीड जिल्ह्यासाठी तरी द्यावा अशी विनंती सकल मराठा समाजाकडून केली जात आहे.

★फडणवीसांच्या तालावर नाचणारे मराठे ओळखा!

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच मराठा समाजाचा द्वेष केला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणात मोठ विघ्न म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मराठा समाजाला आरक्षण मिळून आहे म्हणून वाटेल त्या थराला जाणारे एकमेव व्यक्ती म्हणजेच फडणवीस आहेत. हेच देवेंद्र फडणवीस सध्या बीड जिल्ह्यामध्ये मराठ्यांनाच मराठा विरुद्ध पेटवण्याचे काम करत आहेत पण फरानुसार हा डाव सर्वसाधारण मराठा साध्य होऊन देणार नाही. बोटावर मोजणारे फडणवीसांच्या तालीवर नाचतात परंतु लाखो मराठे जरांगे पाटलांचा आदेश मानतात त्यामुळे बीड जिल्ह्यात तरी फडणवीसांची पोळी भाजणार नाही यातील मात्र शंका नाही.

★मराठा नेत्यांच्या खेकडा प्रवृत्ती समाजाला घातक!

मराठा समाजाच्या माती खेकडा प्रवृत्तीचा विघ्न पहिल्यापासूनच आहे, ते पुसण्याचे काम संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलं परंतु पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये नेत्यांकडून मराठ्यांची बदनामी सुरू असल्याचे दिसून येत आहे. खेकडा प्रवृत्ती दाखवून समाजाला पुन्हा बदनाम करण्याचे कार्य सुरू आहे त्यामुळे नेत्यांनो सुधरा खेकडा प्रवृत्ती बंद करा अन्यथा तुम्हालाच खेकड्यासारखं ठेचून काढले जाईल असं मराठा समाजाचा रोष सोशल मीडियावर पुढे येत आहे.

★पाटील तुम्ही बीडला अपक्ष उमेदवार एक द्या बरं..

बीड जिल्ह्यातील बरेच राजकीय नेते देवेंद्र फडणवीस च्या दावणीला बांधलेले आहेत. बीड लोकसभेला फडणवीस चांगलाच खेळ खेळताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या खेळीला मराठ्यांचे राजकीय नेते बळी पडत असून समाजाचे वाटोळं करताना दिसत आहेत परंतु समाज आता जरांगे पाटलांचा आदेश मानतो त्यामुळे नेत्यांमधील खेकडा प्रवृत्ती आता बदला अन्यथा तुमचाच कार्यक्रम केला जाईल यातील मात्र शंका नाही. बीड जिल्ह्यातील मराठा समाजाने जरांगीपाटलाकडे विनंती केली आहे पाटील तुम्हीच आता बीड साठी अपक्ष उमेदवार सुचवा त्याला निवडून आणायची जबाबदारी आमची आता याकडे पाटील कसे पाहतात पहाव लागेल…

★मराठ्यांचे नेते खेकडा प्रवृत्ती सोडणार नसतील तर आम्ही सरसकट नोटा मारू

बीड जिल्ह्यातील मराठ्यांचे नेते खेकडा प्रवृत्ती सोडणार नसतील तर सरसकट नोटा मारल्या जातील अशा प्रतिक्रिया सर्वसाधारण मराठा समाजामधून सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहेत. मग बसा बोंबलत अशा भावना मराठा समाजाच्या सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!