पंकजा मुंडे विरुद्ध एकच उमेदवार हवा !
★बीड लोकसभेची निवडणूक एकतर्फी करू नका ; मराठ्यांचे तीन उमेदवार आल्याने जनतेत नाराजी
बीड | सचिन पवार
लोकसभा निवडणुकीचा रणसिंग फुंकल्याने सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी केली आणि कामाला देखील लागले. भारतीय जनता पार्टी कडून पंकजा ताई मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली असून त्यांनी मोर्चे बांधणी आणि प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून बजरंग बप्पा सोनवणे यांना नुकतीच उमेदवारी जाहीर झाली आणि ही निवडणूक अतिशय अटीतटीची होणार असं बोललं जात असतानाच ज्योतीताई मेटे अपक्ष उभा राहण्याची शक्यता वर्तवली जात असून वंचित बहुजन आघाडी कडून अशोक हिंगे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने ही निवडणूक पंकजाताई मुंडे यांना ही निवडणूक एकतर्फी मिळाल्याचे बोलले जात आहे.
बीड लोकसभेला पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग बाप्पा अशीच जर फाईट झाली तर अटीतटीची निवडणूक होऊ शकते परंतु यांच्या व्यतिरिक्त ज्योतीताई मेटे आणि अशोक हिंगे जर रिंगणात आलेच तर पंकजा मुंडे यांच्यासाठी ही निवडणूक एकतर्फी होणार यातील मात्र शंका नाही त्यामुळे सकल मराठा समाजाकडून आणि बीड जिल्ह्यातील जनतेकडून ही निवडणूक एकतर्फी न होता अटीतटी की निवडणूक व्हावी अशी अपेक्षा असून पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग बप्पा यांच्यातच ही निवडणूक व्हावी. इतर एकही उमेदवार पुढे येऊ नये अशी बीड जिल्ह्यातील जनतेची भावना आहे. तर दुसऱ्या बाजूला मराठा समाजाकडून बजरंग बाप्पा ज्योतीताई मेटे अशोक जी हिंगे यांना आव्हान करण्यात आले असून तिघांनीही संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांची भेट घ्यावी आणि एकच उमेदवार ठेवावा असं आव्हान देखील करण्यात आले आहे. जर तिघांनीही भेट नाही घेतल्यास बीड जिल्ह्यातील सकल मराठा समाज वेगळाच पर्याय निवडेल यात तीळ मात्र शंका नाही. लवकरच बजरंग बाप्पा ज्योतीताई आणि अशोक जी यांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन तिघांनीही भूमिका स्पष्ट करावी आणि एकच उमेदवार जाहीर करावा अन्यथा बीड जिल्ह्यातील मराठा समाज तिघांनाही बाजूला सारून वेगळीच भूमिका घेईल असे देखील सोशल मीडियावर बोलले जात आहे.
★..तर पंकजा मुंडे यांचा विजय निश्चित!
बीड लोकसभेला पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग बाप्पा, ज्योतीताई मेटे, अशोक हिंगे उभे राहिले तर पंकजा मुंडे यांचा विजय आजच निश्चित झाला असं म्हणावं लागेल आणि ही निवडणूक एकतर्फी होईल यातही तीळ मात्र शंका उरली नाही.
★बजरंग बप्पा, ज्योतीताई, अशोक हिंगे हे पाटलांची भेट घेणार का ?
बीड लोकसभेला राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बजरंग बप्पा यांची उमेदवारी जाहीर झाली असून ज्योतीताई मेटे अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत तर वंचित बहुजन आघाडी कडून अशोक हिंगे यांना उमेदवारी मिळाल्याने पंकजा मुंडेंना ही निवडणूक अगदी सोपी झाल्याचे बोलले जात आहे. परंतु मराठा समाजाचा भावना लक्षात घेऊन बजरंग बाप्पा, ज्योतीताई, अशोक हिंगे काय निर्णय घेणार आणि काय नाही हे पाहावं लागणार आहे. या तिघांनाही जातीपेक्षा पक्ष महत्त्वाचा वाटतो का असाही संतप्त सवाल मराठा समाजातून समोर येत आहे.
★मराठ्यांपेक्षा बजरंगबप्पा, ज्योतीताई, अशोकजी तुम्हाला पक्ष महत्त्वाचा वाटतो का ?
बीड जिल्ह्यातील मराठा समाजाकडून संतप्त प्रतिक्रिया समोर येत असून बजरंग बाप्पा ज्योतीताई अशोकजींना फाईलवर घेतलं जात आहे मराठा समाजापेक्षा तुम्हाला पक्ष महत्त्वाचा वाटतो का ? मराठा समाजासाठी पाटील महत्त्वाचे आहेत तुम्ही नाही. तुम्ही तिघांनीही पाटलांची भेट घ्यावी आणि एकच उमेदवार ठेवावा असेही आव्हान करण्यात येत आहे अन्यथा तुम्हा तिघांनाही बाजूला सारून पंकजा मुंडेच निवडून येतील अन्यथा मराठा समाज वेगळाच पर्याय निवडलेली यातील मात्र शंका नाही त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तिघांनीही पाटलांची भेट घ्यावी असा आव्हान मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. तुम्ही तिघांनीही सोबतच भेट घ्यावी असेही आव्हान करण्यात येत आहे.