फडणवीसांची कूटनीती तर मराठ्यांचा गनिमी कावा !
★महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात फडणवीसनी ” बी टीम ” उभा केली
बीड | सचिन पवार
भारत देशाची निवडणूक सुरू झाली. डावपेच मोर्चे बांधण्या सुरू झाल्या. फोडाफोडी सुरू झाली. कुटनीती सुरू केली. परंतु महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचा गनिमी कावा सुरू झाल्याने सर्वच राजकीय नेत्यांच्या आणि पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मराठा काय करणार याकडे सर्वच देशाचे लक्ष लागलं आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनी अपक्ष उमेदवार देण्याचा निर्णय घेतला होता परंतु त्यांनी तो निर्णय रद्द करत ज्या ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आहे अशांना पाडण्याचा निर्णय घेतल्याने निवडणुकीत रंगत निर्माण केली आणि सर्वांनाच धडकी भरली आहे.
लोकसभा निवडणूक 2024 च्या निवडणुकीत मनोज जरांगे पाटलांच्या नावाची अख्या देशांमध्ये चर्चा सुरू झाली. पाटलांच्या निर्णयान सर्वच नेत्यांच्या पायाखालचे आणि पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मराठा वोटर काय करणार याकडे सर्वच पक्ष लक्ष ठेवून आहेत. एकूणच सोशल मीडियाचा अंदाज घेता मराठा वोटर एक शिक्क्यानं मतदान करण्याच्या विचारात आहेत. मी मी म्हणणाऱ्यांचा आणि हा माझा बालेकिल्ला म्हणणारे सुद्धा मूग गिळून गप्प बसू लागले आहेत. कोणताच बालेकिल्ला कोणाचाच नाही हे मराठ्यांनी दाखवून दिले आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत सर्वांनाच दिसणार आहे यात तीळ मात्र शंका नाही. देवेंद्र फडणवीस यांनी कूटनीति सुरू करून एम आय एम – वंचित यांना उमेदवार देण्यासाठी भाग पाडले आणि मराठा वोटर त्यांच्याकडे ओढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत परंतु मराठा समाज याला बळी पडणार नाही आणि ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आहे त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत असे देखील सोशल मीडियावर व्यक्त केलं जात आहे. फडणवीस यांच्या कूटनीतीला मराठा समाज चांगलाच ओळखून आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा समाज फक्त फडणवीस यांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहे. यावेळेस फडणवीसांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा निर्णय मराठ्यांनी घेतला आहे.
★वंचित – एमआयएम भाजपची बी टीम ?
संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी अपक्ष उमेदवार न देण्यात आली मोठा निर्णय घेतल्याने फडणवीसांची गोची झालेलं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी वंचित एमआयएम च्या नावाखाली अपक्ष उमेदवार उभा करून भाजपला फायदा करून घेण्याचा फडणवीसांचा सुरू असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. आता योग्य निर्णय करणार यात शंका नाही. फडणवीस यांची कटनीति जनतेपुढे फेल ठरणार आहे.
★मराठा वोटर कडे लक्ष!
महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आंदोलन अधिक तीव्र झाल्याने लोकसभेवर त्याचा चांगलाच परिणाम होणार आहे. लोकसभेला अपक्ष उमेदवार देण्याचा निर्णय संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी घेतला होता परंतु राजकारणातील ओरिजनल टॉपिक त्यांच्या लक्षात आल्याने अपक्ष उभा करण्याचा निर्णय मागे घेत ज्यांनी विरोध केला त्यांना पाडण्याचा निर्णय घेतल्याने सर्वच नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आता मराठ्यांचा गनिमी कावा सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
★जरांगे पाटलांनी अपक्ष उमेदवार न देऊन गनिमी कावा केला
लोकसभेला एकही अपक्ष उमेदवार न देण्याचा निर्णय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनी घेतल्याने महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. खास करून देवेंद्र फडणवीस यांच्या पायाखालची वाळू सरकली असून आता वंचित एम आय एम ला पुढे करत अपक्ष उमेदवार देऊन चाणक्य नीति सुरू केल्याचा दिसत असलं तरी जरांगे पाटलापुढे सर्व चाणक्य नीति फेल होत चालल्या आहेत यात तीळ मात्र शंका नाही.