इथे कोणी वाघ ना वाघोबा…!
येथे लोकशाही आहे येथे कोणीही वाघ आहे ना वाघोबा…! येथे सर्वांना भ्रष्टाचारच्या विरोधात आवाज उठवण्याचा आपल मत मांडण्याचा ,आपल्या भावना व्यक्त करण्याचा आणि अन्यायाविरुद्ध न्याय मागण्याचा हा अधिकार आहे. इथे तुम्ही कोणाला घाबरू नका.उलट ,तुम्ही कोणाला घाबरलात तर ते दुष्ट अधिक प्रमाणात तुम्हाला घाबरवणार कारण त्यांची दुकानदारी तुमच्या घाबरण्यामुळे आहे. हे पक्क लक्षात घेतले पाहिजे. जीवनामध्ये ‘डर कर नही तो डटकर ‘ जीवन जगले पाहिजे..
खरंतर एका काळी स्वातंत्र्यासाठी आणि हक्क अधिकारासाठी परकीय शक्तींशी आपल्याला लढावं लागत होतं, आता स्वातंत्र्य तर आहे. परंतु स्वकींयाच राज्य असताना सुद्धा नोकऱ्यासाठी बेरोजगारांना रोजगार ,दैनंदिन जीवनातील महागाई ,भ्रमसाठ भ्रष्टाचार या दलदलीमध्ये दिवसेनादिवस जनता फसत चाललेली आहे. या सर्व समस्या च्या ओझ्याखाली खाली दबली गेली आहे.. माणसाला आपले हक्क समजले पाहिजे यासाठी साक्षर व्हावं लागेल. महात्मा फुले यांच्या डोक्यामध्ये एक विचार आला की स्री शिकल्याशिवाय घर सुशिक्षित होऊ शकत नाही. त्यांना त्यांचा अधिकार समजणार नाही. त्यासाठी त्यांनी 1848 रोजी भारतातली पहिली स्त्रियांची शाळा काढली. मग समाजकंटकांनी त्यांच्यावर अतोनात वेदना देण्याचा प्रयत्न केला..त्यांच्याकडे मारेकरे धाडले गेले परंतु त्यांनी त्यांनाही भिक घातले ( म्हणजे घाबरले नाही ) .कोणालाही न घाबरता त्यांनी ती क्रांती घडवून दाखवली . महात्मा फुले त्या ठिकाणी घाबरले असते तर ,आज निर्भीड स्रीयां व सुशिक्षित हा समाज आपल्याला दिसला नसता..! त्यामुळे कोणाच्या दबावाला बळी न पड़ता समोर आले पाहिजे. आज तर तुमच्या हक्कासाठी संविधान धावून येते फक्त ते आत्मसात करण्याची गरज आहे. निसर्गाने माणसाला माणूस बनवलं मात्र माणसाने स्वतःला कोणत्यातरी पक्षाचे किंवा राजकीय पुढाऱ्याचे गुलाम होजोगीरी करण्यासाठी आपलं अस्तित्व समर्पित केलं हीच तर समाजाची शोकांतिका आहे. मग याचा गैरफायदा राजकीय पुढारी घेतात एकमेकांच्या प्रति माथ्ये भडकवण्यात ते यशस्वी ठरतात.. अरे निसर्गाने आपल्याला मूल्यवान जीवन दिले आहे माणुसकीवादी बनण्यासाठी कुणाची तरी गुलामी करण्यासाठी नाही , हे समजणे आता काळाची गरज आहे.लोकशाहीमध्ये येथे कायमची मक्तेदारी किंवा दावेदारी कोणाची नाही . असं कुणी लक्षात सुद्धा आणले नाही पाहिजे. कारण मनुस्मृतीच्या जाचक कायदे झुगारून भारतीय जनतेने लोकशाही आणि संविधानाचा स्वीकार 26 जानेवारी 1950 अमल सुरू केला गेला. त्यामुळे खऱ्या अर्थाने येथील जनता स्वतंत्र आणि सार्वभौम झाली. “लोकांनी लोकांसाठी चाललेले हे राज्य म्हणजेच लोकशाही” येथे सर्वांना सारखाच हक्क आहे म्हणून आम्ही म्हणतो इथे कोण वाघ आहे ना वाघोबा..
– अतुल अण्णा शेलार
सामाजिक कार्यकर्ते कुसळंब.