वैचारिक व सामाजिक कार्यातील ” अतुल्य ” कार्याचा उगम – अतुल शेलार
” तुझं आहे तुझं पाशी परत जागा चुकलासी ” या म्हणीप्रमाणे आपल्यातील एखादी विशेष गुण शोधण्याची क्षमता जेव्हा आपल्यामध्ये निर्माण होते तेव्हा आपल्या हातून नक्कीच सामाजिक कार्य घडण्यास सुरुवात होते याच पद्धतीने कुसळंब येथील सामाजिक कार्यकर्ते अतुल शेलार यांनी देखील आपल्यातील तेच गुण ओळखले आणि त्याला विचाराची जोड देत सामाजिक कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतले. आज त्यांना वैचारिक आणि सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतलेलं अतुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून अतुल शेलार यांना ओळखलं जातं त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यावर आणि विचारावर प्रकाश टाकण्यासाठी लिहिलेला हा लेख आहे प्रथम त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
सामाजिक कार्य करताना विचाराची देणगी असावी लागते ज्यावेळेस विचाराची देणगी आपल्याजवळ असते त्याच वेळेस आपल्याला सामाजिक कार्य करताना आणि माणुसकीचे जतन करताना अडचणी येत नाही जेव्हा आपल्यापाशी विचार असतात तेव्हा आपल्याला काहीतरी करण्यास भाग पाडले जाते त्याच पद्धतीने सामाजिक कार्याला चांगले विचाराची गरज असते तेच विचार अतुल शेलार यांच्यामध्ये असल्याने आज त्यांचं सामाजिक कार्य अतुल्य झालेलं पाहायला मिळत आहे. कोरोना काळात देखील त्यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता काम करून अनेकांना मदतीचा हात दिला आहे. राजकारणाच्या माध्यमातून अनेकांना आपलं राजकारणातले वेगळेपण दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा आरक्षणासाठी ग्रामस्थांनी टाकलेला बहिष्कार त्याला दिलेला पाठिंबा हे तितकच मोठे योगदान अतुल शेलार यांचे देखील आहे. कोणत्याही व्यक्तीला कुठेही गरज भासली त्या ठिकाणी अतुल शेलार यांना फोन आला की नक्कीच त्यांच्याकडून त्या व्यक्तीला मदत करण्याचा प्रयत्न केला जातो आणि परत देखील पोहोच केली जाते मग ती कोणतीही असो हे जेव्हा आपले विचार परिपक्व झालेले असतात तेव्हाच आपण कोणाची तरी मदत करण्यासाठी पुढे जातो आणि आपले जर विचार कमकुवत असले तर आपण मदत करताना नक्कीच विचार करतो कारण की तो मला मदत करेल का त्याच्याकडून माझ्या मदतीची परतफेड होईल का असे विचार करतो परंतु ज्या व्यक्तीचे विचार परिपक्व असतात तो या गोष्टीचे विचार न करता पुढील अडचणीत असलेल्या व्यक्तीची मदत करतो आणि आपलं कर्तव्य बजावतो त्याच पद्धतीने अतुल शेलारने आपली ओळख निर्माण केली असून येणाऱ्या काळात त्यांच्या हातून असेच सामाजिक कार्य घडत राहील या तिळमात्र शंका नाही आणि त्यांच्या विचाराला अनेक विचाराची साथ देखील मिळत जाईल यातही तीळ मात्र शंका उरली नाही त्यांच्या हातून अशीच सामाजिक कार्याची भरभराट होवो हीच सदिच्छा आणि वैचारिक सामाजिक कार्यासाठी आमचे सहकारी अतुल शेलार यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा..
-प्रा.सचिन पवार
मो.9921801919