हे जीवन वास्तविक ते वास्तविक पद्धतीने जगले पाहिजे
जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले….!
तो ची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा….!
तुकाराम महाराजांच्या या काव्याप्रमाणे आपण सर्वांनी वास्तविक पद्धतीने जीवन जगले पाहिजे..मानवी जीवन हे निसर्गाचे अनमोल देणगी आहे म्हणून माणसा प्रति माणसाने माणसाप्रमाणेच वागले पाहिजे… जर एखादी व्यक्ती स्वार्थासाठी इतर कोणाचे मुंड्या मुरगळून धनसंपत्ती पैसा सत्ता खोटा स्वाभिमान बाळगत असेल तर निसर्ग नियमानुसार नियती त्या व्यक्तीला कधीही सोडत नाही.आज जरी अशी एखादी व्यक्ती मजा मारत असली तरी येणारा काळ त्याची परतफेड करून घेतच असतो. हे निश्चित असतं म्हणून तुकोबा म्हणतात..
आपले केले आपण खाया ..!
तुका वंदी त्याचे पाया…!
म्हणजे जो स्वतःच्या कष्टाने खातो त्याच्या पाया मी स्वतः वंदन करतो अगदी सोप्या भाषेमध्ये तुकाराम महाराजांनी आपल्या काव्यातून या मानवी जीवनाला संबोधले आहे.मनुष्य जीवन समाजासाठी व समाजातील प्रत्येक घटकांसाठी तसेच परिवर्तनासाठी समाजातील दीनदुबळ्या वंचित अपंग या बाबींना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी खर्च केले पाहिजे. तरच हे जीवन सार्थकी होते.. कोणाच्या ताटातलं ओढून घेतल्याने तात्पुरती भूक भागत ही असेल परंतु ज्याच्या ताटातलं वडून खाल्लं तो व्यक्ती तर उपाशी राहत असेल तर मग त्याच्या आत्म्याची हळहळ ताटातल्या उडून खाणाऱ्या व्यक्तीला लागतच असते. भलेही आता कळत नसले तरी, परंतु कालांतराने नियती त्याला सोडत नसते हाच तर निसर्गाचा नियम आहे. म्हणून सावित्रीमाई फुले म्हणतात ज्ञान नाही नसू द्या, विद्या नाही नसू द्या, अरे ती घ्यायची गोडी हि नाही ..! ती तरी असावी.. ति पण नाहि..?” बुद्धी सर्वांना आहे. ती कुणालाच नाही असं नाही, असूनही ती चालत नाही” तर सावित्रीमाई म्हणतात त्याला “ज्ञान नाही.. विद्या नाही… ती घ्यायची गोडीही नाही तर त्यास ‘मानव’म्हणावे का?? अशा सेलक्या शब्दामध्ये प्रश्न उपस्थित केला गेला आहे.! म्हणून मी म्हणतो माणसाने मानवी मूल्य तरी जपले पाहिजे, उगाच कुणाचा तरी द्वेष करायचा कोणासोबत कोणाचं कोणासोबत पटत नसेल तर आगीत तेल वतल्या गत ओतून मजा मारत बसणे ,दुसऱ्याच्या प्रती सदैव मनात खराब विचार करणे हे असे वागणे मनुष्य जातीला काळीमा फासणारे आहेत…! ज्याप्रमाणे लोकांचे आजार दूर करण्यासाठी डॉक्टरांची गरज असते. त्याचप्रमाणे समाजातील दुष्ट प्रवृत्ती, स्वार्थी, समाजाला फसवणारे,गळ्यात माळा कपाळी टिळा लावून समाजाला अंधश्रद्देच्या खाईत ढकलणारे फसवे, अमिष दाखवून शब्द फिरवणारे, कर्मकांड अनिष्ट प्रथा सर्व प्रवर्त्या दूर करण्यासाठी, गुंडप्रवत्तीना हद्दपार करण्यासाठी..सुशिक्षित ,वैचारिक ,विचारवंत ,साहित्यिक, अभ्यासू, प्रबोधनकार, स्वच्छ कीर्तनकार व्यक्तीने समोरून येवून समाज समाज प्रबोधनातून इलाज करण्याची करण्याची गरज आहे.आता खऱ्या अर्थाने वास्तविकता जोपासण्याची गरज आहे. ती म्हणजे, ‘ज्या गावात त्या ठिकाणीमतदान झाल्यावर लोक एकत्र येऊन चहा पितात..ज्या ठिकाणी संस्कृतपणे मुलं घडवला जातं..ज्या ठिकाणी गावातल्या जिल्हा परिषद शाळा चांगल्या दर्जाच्या बांधलेल्या असतात आणि तिथे चांगले दर्जेदार शिक्षण देण्यासाठी योग्य पद्धती लक्ष दिले जाते ‘ज्या ठिकाणी निवडणुकीवरून किंवा मतदानावरून राग द्वेष दुश्मनी पत्करली जात नाही.’ज्या ठिकाणी महिलांच्या प्रतिष्ठेला जपलं जातं’ ‘ज्या ठिकाणी यशस्वी झालेले लोक आपल्या गावात मुलांना चांगलं मार्गदर्शन करतात’ अशा लोकांनाच वास्तविक जीवनाचे खरे शिल्पकार म्हणायला हवे…
– अतुल अण्णा शेलार
( समाजीक कार्यकर्ते कुसळंब ता. पाटोदा )