लोकशाहीच्या मजबुतीसाठी मतसाक्षरता हाच एकमेव पर्याय !
भारत देशाच्या निवडणुकीत रणसिंग फुंकल्यामुळे आणि नेतेमंडळी कडून सुरू असलेल्या निवडणुकीच्या तोंडावर फसव्या योजनेचा सुळसुळाट हा बगवत नाही. भारत देशातील हा सुज्ञ हुशार नागरिक निवडणुकीच्या वेळी नेत्यांच्या फसव्या योजनेला बळी पडत अक्षरशः निरक्षर होतो नेतेमंडळींकडे निवडणुकीच्या तोंडावर फसव्या योजना राबवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच योजनेला सुज्ञ सुशिक्षित हुशार मतदार मात्र निरक्षर पणे फसला जातो. सध्या भारत देशाच्या निवडणुकीचा वातावरण तापू लागले आहे म्हणजेच लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असून प्रत्येक पक्षाकडून मोर्चे बांधणी केली जात आहे सत्ताधारी पक्षांकडून फसव्या योजनेचा सुळसुळाट केला जात आहे तर विरोधी पक्षांकडून तुम्हाला असं करू तुम्हाला ती योजना देऊ असं सांगून गाजर दाखवण्याचं काम सुरू झालं आहे. गाव पातळीवर पक्षाचे पाळीव कार्यकर्त्यांकडून सर्वसामान्य मतदार जनतेला फसवण्याचे धंदे सुरू झाले आहेत भोळी भाबडी जनता अपेक्षा पोटी त्या पाळीव कार्यकर्त्यांकडून अपेक्षा ठेवून बसली आहे परंतु त्यांना काय माहिती निवडणूक संपल्या की तुम्हाला कोणी विचारणार नाही तुमच्यावर फसव्या योजनेचा पाडलेला पाऊस अचानकपणे गायब सुद्धा होऊन जाईल.. निवडणुकीपुरतं फसवा योजना आणि गाजर दाखवण्याचे धंदे सुरू आहेत जनतेकडूनच पैसे उकळत निवडणुकीमध्ये त्यांनाच वाटण्याची काम सुद्धा केले जात आहेत. हे सर्व दिसत असताना जनता मात्र निरक्षरपणे मतदान करते आणि पाच वर्षे पुन्हा त्यांच्या तोंडाकडे पहात बसते मग नेता सुज्ञ हुशार असताना देखील निवडणुकीला मतदान करतेवेळी निरक्षरपणे मतदार करून पाच वर्षे बोंबलत का बसते असे प्रश्न उपस्थित होतात. परंतु याच सुज्ञ हुशार मतदारांना निवडणुकीच्या वेळी कुणी फसवलं जाऊ नये त्यांना कोणी आम्हीच दाखवून आपल्या मताचा कोणी गैरवापर केला जाऊ नये यासाठी जागृत करण्यासाठी थोडं लिहिण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. गाव पुढारी सर्वसामान्य जनतेला कुठल्यातरी योजनेचे आम्हीच दाखवून आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात सर्वसामान्य जनता देखील त्यांच्यावर विश्वास ठेवून काहीतरी आपलं चांगलं होईल या हेतून मतदान करते परंतु त्यांना अक्षरशा फसवलं जातं हेच जागृतीकरण करण्यासाठी लिहिण्याचा मी प्रयत्न करत आहोत. एका बाजूला महागाई बेरोजगारी शिक्षण नोकरी रोजगार आरोग्य शेतीमाल भाव हे मुद्दे अभिप्रेत वाढतात अशातच उमेदवारा प्रति मतं साक्षर होण्याची बौद्धिक गुणवत्ता दाखवली पाहिजे तरच लोकशाहीला अभिप्रीत व्यवस्था निर्माण होईल अन्यथा पिढ्यांना पिढ्या बरबाद होताना आपण सर्वजण पाहत आहात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानारूपी दिलेला हक्क आपण अक्षरशा नेत्यांनी दाखवलेल्या अमिषा पोटी कवडीमोल भावाने विकून टाकतो ते ही पाच वर्षासाठी आणि पाच वर्षात आपल्या त्याच मताच्या जीवावर कोट्यावधी कमवणारे हेच भामटे नेतेमंडळी आपल्याला पाच वर्षे त्रास द्यायला बसलेली असते. फसव्या योजना दाखवत कोट्यावधी कमवणारे हे नेतेमंडळी निवडणुका आल्या की बेडकासारखे बाहेर येतात आणि निवडणुकीत मतदान घेतलं की पुन्हा एकदा बिळात जाऊन बसतात आणि स्वतः खाऊन खाऊन फुगतात अशीच परिस्थिती सध्या भारत देशामध्ये झाली आहे आजही भारत देशात कोणत्या ना कोणत्या निवडणुका म्हटल्या की त्या निवडणुकीला जातीय धार्मिक पारंपारिक मुद्दे उकरून वेगळे वळण दिले जाते मग आपण मत साक्षर असलो तर हे लगेच ओळखता येते मग तो आपल्या जातीचा असो किंवा पंथाचा असो तो कोणत्याही जाती धर्माचा असो ओळखले तरच लोकशाहीला अपेक्षित गोष्ट आहे अन्यथा आपण आपलं बहुमूल्य मत लाचार भामट्या लोकशाही विरुद्ध कटकारस्थान करणाऱ्यांच्या हातात नैवेद्य दाखवल्यासारखे देतो हे मात्र तितकाच खर आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर या छोट्याशा लेखांमधून सांगण्याचा आमचा एकच प्रयत्न आहे की आपण निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी विरोधी पक्षनेता आपल्याला गाजर दाखवतील अपेक्षा दाखवतील फसव्या योजना दाखवून तुमच्याकडून पैसे उकळतील अशा लोकांपासून सावध रहा आणि आपल्याला दिलेल्या मतदानाच्या बहुमूल्य अधिकाराचा योग्य उपयोग करा योग्य उमेदवार निवडा त्यालाच मतदान करून आपल्या आवाजाला धार देण्याचा प्रयत्न करा अन्यथा तुम्ही हुशार साक्षर असून देखील मतदानाच्या वेळी निरक्षर होतात हे पुन्हा सिद्ध होईल यात तिळ मात्र शंका उरणार नाही. विचार करा, जागरूक रहा, योग्य उमेदवाराला मतदान करा हेच आव्हान करण्यासाठी छोटासा प्रयत्न आहे.
– अतुल अण्णा शेलार
सामाजिक कार्यकर्ते कुसळंब.