24.6 C
New York
Saturday, August 30, 2025

Buy now

spot_img
spot_img

पंकजाताई तुमच्यात इतका कॉन्फिडन्स येतो कुठून ?

पाटलांच्या कोटींच्या सभेचे रूपांतर मतदानात होणार का ?

★पंकजा मुंडे म्हणाल्या बीड लोकसभेला मराठा आंदोलनाचा फरक पडणार नाही

★विद्यमान खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या आधी आपला समाज आणि नंतर इतर समाज

बीड | प्रतिनिधी

देशाच्या महत्त्वाच्या निवडणुकीकडे सर्व जगाचे लक्ष लागला आहे. लोकसभा निवडणूक 2024 च्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सर्व पक्ष्यांची मोर्चे बांधणी सुरू झाली असून अनेक ठिकाणचे उमेदवार जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रातील 48 जागांपैकी बऱ्याच जागांवरील उमेदवार जाहीर झाले असून उमेदवार आपापल्या परीने तयारीला लागले आहेत. बीड जिल्ह्यातील लोकसभेसाठी भाजपने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना विश्रांती देत त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केल्याने अनेकांच्या भवया उंचावले असून सोशल मीडियावर फडणवीसांकडे बोट दाखवल्याचे चित्र दिसत आहे. मुंडे घराण्याला महाराष्ट्रातून मुक्त करण्यासाठी फडणवीस यांचा हा डाव आहे की काय ? अशी ही चर्चा सुरू आहे. लोकसभेची बीडची जागा ही ओबीसी समाजाला दिल्याने विरोधी पक्ष या ठिकाणी मराठा उमेदवार देणार त्यामुळे ह्या जागेत अधिक रंगत वाढणार आहे. असून बीड लोकसभेला शरद पवार गट कोण उमेदवार देणार तसेच संघर्ष योद्धा मनोज जरांगे निवडणुकीत कोणतं पाऊल उचलणार यावरही बरेच चित्र अवलंबून असणार आहे, त्यामुळे सध्या तरी बीडची लोकसभा कोण जिंकणार आणि कोण हरणार कोण उमेदवार असणारा असे अनेक असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत. बीड लोकसभेला मनोज जरांगे पाटील यांनी जर उमेदवार दिला तर निवडून येण्याची शाश्वती देखील सर्वसामान्य जनतेमधून समोर येत आहे. उमेदवार कोणीही द्या फक्त उमेदवार द्या अशी बीडच्या जनतेतून मागणी येत असल्याने भाजपच्या उमेदवारांना देखील मोठा फटका बसू शकतो यात तीळ मात्र शंका नाही. एवढं असताना देखील पंकजाताई म्हणतात की बीडच्या निवडणुकीत मराठा आंदोलनाचा कसलाही परिणाम होणार नाही, या पंकजाताई च्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत पंकजाताई मध्ये हा कॉन्फिडन्स येतो कुठून असाही प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित होत असून यातून शिकण्यासारखं बरच काही आहे असे देखील चर्चेमधून पुढे येत आहे. तर दुसऱ्या बाजूला विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांनी एका कार्यक्रमांमध्ये बोलताना म्हटल्या की प्रथम समाज आणि नंतर इतरांचा विचार करा असेही बोलण्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याने बीडच्या लोकसभेला चांगलीच रंगत आलेलं दिसत आहे. येणाऱ्या काळात बीडची निवडणूक ही महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळीच दिशा देणारे ठरेल यातही तीळ मात्र शंका उरली नाही.

★पाटलांच्या कोटीच्या सभा पंकजाताईंनी किरकोळ समजल्या का ?

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली कोटीने मराठे सभेसाठी एकवटले असले तरी पंकजाताईंनी त्या सभेला समजल्यासारखं वक्तव्य केले आहे. येणाऱ्या बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा आंदोलनाचा फरक पडणार नसल्याचा स्पष्ट वक्तव्य केल्याने होलसेल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आता मराठा समाज काय करतो यातले सर्वांचाच लक्ष लागला. का नेहमीप्रमाणे मराठा समाज पुन्हा लाचार होतो हे पण पाहावे लागेल..

★मराठ्यांचे एकही मत नाही पडलं तरी पंकजा मुंडे निवडून येतील का ?

मराठा समाजाला नेहमी इतर समाजातील नेत्यांनी शिरपूर समजलं असून येणाऱ्या लोकसभेला देखील बीडमध्ये मराठा समाजाची किंमत नसल्यासारखं पंकजा मुंडे यांनी वक्तव्य केला आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या येणाऱ्या लोकसभेला मराठ्यांच्या आंदोलनाचा फरक पडणार नाही यावरून मराठ्यांचे एकही मत नाही पडलं तरी पंकजा मुंडे निवडून येतील असा तर नाही ना ? अशी चर्चा सोशल मीडियावरील व्यक्त होत आहे.

★बीड लोकसभेला मराठा चेहरा पर्याय आहे का ?

बीड लोकसभा निवडणुकीसाठी जरांगे पाटलांनी आव्हान केल्यानंतर मराठा समाज एक वाटला जाईल का ? एक वाटला तर मतात रूपांतर होईल का ? आणि रूपांतर झालं तर मराठा उमेदवार निवडून येईल का ? असे अनेक प्रश्न असले तरी सोशल मीडियावर मात्र मराठा समाजाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात असल्याचा दिसून येत आहे.

★बीडची जनता नेत्यांच ऐकणार का ?

मराठा आंदोलनामुळे सर्व नेत्यांवर सर्वसामान्य जनतेचा रोष निर्माण झाला आहे त्यामध्ये आता लोकसभेची निवडणूक लागल्याने सर्वच नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दिसत असले तरी त्यांच्या मागे जनता किती उभे राहते हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. लोकसभेच्या निवडणुकीला नेत्यांच्या मनावर मतदान होणार का जनता स्वतःचे मतदान स्वतःच्या मनावर करणार हा सर्वात मोठा प्रश्न समोर उभा आहे. जनतेने कोणाचंच न ऐकता मतदान केलं तर बीडचा खासदार नक्कीच वेगळा दिसेल यात तिळमात्र शंका नाही.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!