पाटील तुम्ही म्हणताल तो बीडचा खासदार फक्त आदेश द्या : सर्वसामान्य जनता
★बीड जिल्ह्यातील जनता म्हणतीये पाटलांचा सच्चा शिलेदार किशोर पिंगळे होणार खासदार
बीड | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यामध्ये आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर वेगळी ओळख निर्माण करणारे किशोर पिंगळे सध्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून सावलीप्रमाणे मराठा आरक्षणाची लढाईमध्ये सहभागी होऊन खारीचा वाटा उचलत आहेत. बीड जिल्ह्यानेच नव्हे तर महाराष्ट्राने पाहिले किशोर पिंगळे म्हणजे जरांगे पाटलांची सावलीच आहे, हीच सावली बीड जिल्ह्याची खासदार होणार अशी चर्चा बीड जिल्ह्यातील प्रत्येक गावापासून तालुक्यापर्यंत आणि तालुक्यापासून जिल्हापर्यंत पोहोचू लागली आहे. आता फक्त संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या आदेशाची वाट पाहत आहेत.जरांगे पाटील म्हणतील तोच बीडचा खासदार होईल हाच निर्धार बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेने केला आहे.
बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनातील आणि हक्काचं नेतृत्व आणि भावी खासदार म्हणून किशोर पिंगळे यांच्याकडे पाहिलं जात आहे. राजकारणापासून अलिप्त जरी जरी असले तरी सर्वसामान्यांचे प्रश्न किशोर पिंगळे सोडतात, सोडत आले आहेत आणि भविष्यात सोडतील हीच भावना अपेक्षा सर्वसामान्य जनतेमध्ये आजपर्यंत टिकून आहे. मराठा आरक्षणामध्ये स्वतःला झोकून देऊन संघर्षाची वाट धरणारे किशोर पिंगळे आज सर्वांच्या मनात खासदार म्हणून उभे राहिले आहेत. बीड जिल्ह्याचे भावी खासदार म्हणून किशोर पिंगळे यांना पाहण्याची बीड जिल्ह्यातील सर्व जाती धर्मातील लोकांची इच्छा निर्माण झाली आहे. आता फक्त जरांगे पाटलांच्या आदेशाची वाट पाहत आहे सर्वसामान्य जनता.. खासदार तर पाटलांच्या मनातील आणि पाटलांच्या तालमीतीलच होणार यात तीळ मात्र शंका नाही, असा ठाम विश्वास बीड जिल्ह्यातील जनतेचा आहे. जरांगे पाटलांनी आदेश दिला तर किशोर पिंगळे यांना खासदार बनवण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व जाती धर्मातील जनता एकत्र येऊन किशोर पिंगळे यांना खासदार बनवतील आणि खऱ्या अर्थानं संघर्षाला न्याय मिळेल आणि सर्वसामान्य जनतेला आधार मिळेल यात तीळ मात्र शंका नाही अशा भावना सर्वसामान्य जनतेमधून पुढे येत आहेत.
★अकरा तालुक्यात किशोर पिंगळे यांचे शिलेदार!
स्वकर्तुत्वावर किशोर पिंगळे यांनी राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये आपले स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून सर्वसामान्य जनतेला आधार देण्यासाठी राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आज पर्यंत मोठे जाळे उभा केले असून सर्वसामान्य जनतेला आधार देण्याचे काम केले आहे. आता मनोज जरांगे पाटलांच्या सोबतीला राहून मराठा आरक्षणात घेतलेली महत्त्वाची भूमिका चोखपणे पार पाडल्याने सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये किशोर पिंगळे यांनी घर केले आहे, त्यांना बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून पहायची बीड जिल्ह्यातील सर्व जाती धर्मातील लोकांची इच्छा आहे. आता फक्त आदेश पाटलांचा बाकी आहे.
★…तर किशोर पिंगळे होतील बीडचे खासदार!
मराठ्यांचा क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटील यांनी जर आदेश दिला आणि किशोर पिंगळे यांना खासदारकीची उमेदवारी देऊन सर्वसामान्य जनतेला निवडून आणण्यासाठी आव्हान केले आणि आपल्या हक्काचा उमेदवार आपल्याला संसदेत पाठवायचा आहे असे सांगितले तर बीड जिल्ह्यातील अठरापगड जाती, सर्वसामान्य जनता किशोर पिंगळे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील आणि निवडून आणून संसदेत पाठवतील यात तीळ मात्र शंका नाही, आता फक्त जरांगे पाटलांचा आदेश बाकी असल्याने सर्वसामान्य जनता वाट पाहत आहे.
★जरांगे पाटलांचा आदेश आणि किशोर आप्पांचा होकार महत्त्वाचा
बीड लोकसभेसाठी वेगवेगळ्या पक्षाकडून रणनीती आखली जात आहे परंतु मराठा आरक्षणाचा मुद्दा लक्षात घेता संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांचा आदेश महत्त्वाचा मानला जात आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांची सावली म्हणून किशोर पिंगळे कडे पाहिलं जात. पाटलांचा आदेश आणि किशोर आप्पांचा होकार आला तर सर्वसामान्य जनता बीडचा खासदार किशोर पिंगळे यांना करण्यासाठी तयार आहे…