★तालुकास्तरीय पशुप्रदर्शन व स्पर्धेत कुसळंब येथील कृष्णा पवार यांच्या गाईचा प्रथम क्रमांक
पाटोदा | प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील कुसळंब गाव प्रत्येक उपक्रमामध्ये सर्वात पुढे राहिले आहे मग राजकारण असो व शेती असो प्रत्येक ठिकाणी कुसळंबकर स्वतःची वेगळीच ओळख निर्माण करत आहे. नुकत्याच पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद बीड व पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती पाटोदा यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय पशुप्रदर्शन व स्पर्धेमध्ये कुसळंब येथील कृष्णा आप्पासाहेब पवार यांच्या उत्कृष्ट नियोजनातून आणि संगोपनातून गाईचं प्रदर्शन सर्वच गोष्टीत उत्कृष्ट राहिल्याने त्यांच्या गाईचा प्रथम क्रमांक निवडण्यात आला. जिल्हा परिषद संवर्धन उप आयुक्त बीड, जिल्हा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी बीड, पशुसंवर्धन विकास अधिकारी पंचायत समिती पाटोदा यांच्या उपस्थितीमध्ये कृष्णा आप्पासाहेब पवार यांचा सन्मान करण्यात आला.
मोजे पीटी येथे आयोजित करण्यात आलेल्या पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद बीड व पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती पाटोदा यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुकास्तरीय पशुसंव प्रदर्शन व स्पर्धा पिठी येथे आयोजित करण्यात आले होते यामध्ये पाटोदा तालुक्यातील सर्वच गावांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये कुसळंब येथील कृष्णा आप्पासाहेब पवार यांच्या गाईच्या उत्कृष्ट संगोपना मुळे त्यांना प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले प्रत्यक्षेत्रामध्ये कुसळंबकरांनी आपली वेगळीच ओळख निर्माण केली असून कृषी क्षेत्रामध्ये पशुसंवर्धनामध्ये राजकारणामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आपलं नाव कुसळंबकरांचे नाव पुढे येताना दिसत आहे. पशुसंवर्धनाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये पुन्हा कुसळंबच नाव अधिक चर्चेत आल्याने कुसळंबकरांच्या अभिमानात भर पडली आहे.
★शेतकऱ्यांनो पशुसंवर्धनाची सुवर्णसंधी!
ब्रीडिंग फ्रीडिंग अँड मॅनेजमेंट या तीन गोष्टीच पालन केलं तर दुग्धव्यवसाया मध्ये आणि पशुसंवर्धनाच्या सुवर्णसंधी मध्ये आपल्याला नक्कीच सुवर्णकाळ येऊ शकतो यासाठी शेतकऱ्यांनी या गोष्टीवर विशेष लक्ष देऊन दुग्ध व्यवसायाकडे वळलं पाहिजे आणि त्यातून आपल्याला आर्थिक उन्नती कशी अधिक मजबूत करता येईल यावर अधिक भर दिला पाहिजे.
★गाईचे विशेष वैशिष्ट्ये!
माझ्या घाईचा प्रथम क्रमांक येण्यामागची वैशिष्ट्ये
1) 15 महिन्यात सहा महिन्याची गाभण..
2) विशेष म्हणजे सेक्स सॉर्टेड आरमारा बुल ने गाभण राहिली आहे..
3) पंजाब हरियाणावरून आपल्याला अशा प्रजाती आणण्याची गरज नाही त्या पद्धतीच्या प्रजाती आपण इथेच तयार करू शकतो..
4) यामुळे दुधाच्या उत्पन्नात 35 ते 40 लिटर मिळण्याची शक्यता असून खात्रीशीर मिळू शकते अशी ही शाश्वती दिली जात आहे.
5) व्यवस्थित देखभाल जर केली तर आपल्याला पंजाब हरियाणाच्या तोडीस तोड प्रजाती आपण स्वतः तयार करू शकतो हे सुद्धा विशेष आहे.
6) सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळून आर्थिक उन्नती साधता येऊ शकते…
– कृष्णा आप्पासाहेब पवार
तालुकास्तरीय पशुसंवर्धन स्पर्धा प्रथम क्रमांक विजेते पाटोदा, कुसळंब.