पाटोदा तालुक्यासाठी 177 कोटी 72 लक्ष रुपये रस्त्यासाठी मंजूर!
★आ.बाळासाहेब आजबे काकांमुळे शक्य – नागरगोजे, पवार, दगडखैर, मुंडे
पाटोदा | सचिन पवार
आष्टी मतदार संघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात रखडलेल्या कामांना गती मिळाली असून दळणवळण जलसंपदा याचबरोबर शेतकऱ्यांच्या हिताच्या कामांना अधिक प्राधान्य दिल्याने येणाऱ्या काळात सर्वसामान्य नागरिक जनतेच्या जीवनाला त्यांच्या आर्थिक उन्नतीला प्रगती मिळणार आहे. पाटोदा तालुक्यातील प्रमुख रस्त्या करिता 177 कोटी बहात्तर लक्ष रुपये मंजूर करून दिल्याबद्दल आमदार बाळासाहेब आजबे काका यांचे पाटोदा तालुक्याच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करण्यात येत आहे असल्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाटोदा सरचिटणीस अविनाश पवार, सावरगाव सोनेचे सरपंच नारायण मामा नागरगोजे, युवा नेता अनिल दगडखैर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष अविनाश मुंडे यांनी माहिती दिली आहे.
★प्रमुख रस्ते आणि मंजूर निधी!
हिवरसिंगा-रामा 59 पासून वडझरी-डोंगरी-रोहतवाडी रामा 55 वर थेरला-सावरगाव-सोनेगाव-दासखेड-पाचंग्री प्राजिमा 19 किमी 0/00 ते 41/00 मध्ये रुंदीकरणासह सुधारणा करणे या रस्त्यासाठी हायब्रीड ॲन्युटी अंतर्गत 177 कोटी 72 लक्ष मंजूर केले आहेत.
★पाटोदा तालुक्यावर काकांचे विशेष लक्ष!
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघात प्रथमच पाटोदा तालुक्याला एवढा निधी मिळाला असल्याचं पाटोदा तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांमधून बोलले जात आहे. पाटोदा तालुक्यातील रस्त्यासाठी, नगरपंचायतसाठी कोट्यावधीचा निधी मंजूर केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून काकांबद्दल आपुलकी सहानभूती अधिकच वाढत चालली आहे.