खासदारकीला पंकजा मुंडेंना उमेदवारी देऊन भाजप काय साध्य करणार ?
★बीड लोकसभेला पंकजा मुंडे ; भाजपचे तिकीट धोक्यात होतं का ? मुंडे घराणं महाराष्ट्र मुक्त करायचंय ?
बीड | सचिन पवार
महाराष्ट्राचं राजकारण बीड जिल्ह्यातून बऱ्यापैकी चालतं या राजकारणाला खेळ मारण्याचं काम नागपूर मधून केल्याचं जनतेतून कुजबूज ऐकायला मिळत आहे. यात सत्य काय असत्य काय हे लवकरच पाहायला मिळेल यात तीळ मात्र शंका नाही. परंतु तोपर्यंत सर्वकाही संपलेलं असेल का ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. एकेकाळी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या शब्दात पलीकडे न जाणारी महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टी आज त्यांचीच कन्या पंकजा मुंडे यांना महाराष्ट्रातून मुक्त करण्याचा संकल्प करत आहे की काय ? असाही प्रश्न सर्वसामान्य जनतेमध्ये उपस्थित होत आहे.
महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे कमळ फुलवण्यासाठी मुंडे घराण्याचे महत्त्वाचे स्थान राहिले आहे. मुंडे घराण्यामुळे महाराष्ट्रात कमळाचे फूल फुललेलं पाहायला मिळालं परंतु त्याच मुंडे घराण्याला संपवण्यासाठी महाराष्ट्रात देवेंद्र खेळी खेळली जात असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. मग असे प्रश्न जनतेतून उपस्थित होत असताना मुंडे घराण्याच्या हे लक्षात येत नाही का ? त्याचबरोबर लक्षात येत असेल तर मुंडे घराणं कुठेतरी कमी पडत चालले आहे का ? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात उपस्थित होऊ लागले आहे. बीड जिल्हा लोकसभेची उमेदवारी विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना न देता त्यांच्या बहिण माजी मंत्री पंकजा मुंडे यांना देऊन महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टी ने काय साध्य केलं आणि काय साध्य करणार हा देखील महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. सरळ सरळ जर पाहिलं तर मुंडे घराण्याला महाराष्ट्रातून मुक्त करण्यासाठी देवेंद्र खेळी सुरू असल्याचं सर्वसामान्य जनतेमधून ऐकायला मिळत आहे. हे येणाऱ्या काळात सर्वांनाच माहिती होईल यातही शंका उरली नाही.
★पंकजा मुंडे लोकसभेला प्रीतम मुंडे चे काय ?
बीड लोकसभेला विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांची उमेदवारी कट करून माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत असून सर्वसामान्य जनतेमधून एका बाजूला आनंद तर दुसऱ्या बाजूला दुःख व्यक्त केला जात आहे. आनंद याकरिता मुंडे घराण्यालाच खासदारकी मिळाली दुःख याकरिता मुंडे घरान संपवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे का ? आणि तू प्रयत्न असेल तर येणाऱ्या काळात भाजपला याची किंमत मोजावी लागणार यातही शंका नाही…
★पंकजा मुंडे कडून आभार पोस्ट नाही
बीड लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी साधी आभार पोस्ट देखील न केल्याने अनेकांच्या भाववाया उंचावल्या आहेत. महाराष्ट्रात लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक उमेदवारांनी पत्रकार परिषदा घेतल्या सोशल मीडियावर आभार व्यक्त केले परंतु बीड जिल्ह्याची उमेदवारी पंकजा मुंडे यांना जाहीर झाली असली तरी त्यांनी सोशल मीडियावर किंवा पत्रकार परिषद घेऊन आभार व्यक्त केले नाहीत यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत असून जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे.