★भाजपच्या दुसऱ्या यादीत पंकजाताई मुंडे यांचे नाव बीड लोकसभेसाठी अधिकृत जाहीर!
बीड | प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीसाठी अखेर भाजपने बीड मधील विद्यमान उमेदवार खासदार प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी भाजपने माजी मंत्री असलेल्या त्यांच्या बहिण पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केले आहे भाजपने आपली दुसरी यादी जाहीर केली यात नितीन गडकरी नागपूर यांच्यासह बीडमधून पंकजा मुंडे यांचे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
बीड लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण असेल यावरून तर कविता वाढले जात होते. विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली.भाजपने आपला उमेदवार बदलला असल्याचे फर्स्ट जाहीर केले.अखेर आता पंकजा मुंडे यांच्या गळ्यात बीड लोकसभेची उमेदवारी टाकण्यात आली आहे. भाजपने महाराष्ट्रातील 20 जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत.