कष्टाच्या झाडांना गोड फळांचा आस्वाद मिळतोच – योगेश कदम सर
पाटोदा | प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील सौंदना येथील कदम परिवाराने चार एकरवर फुलवली केशर आंब्याची हिरवीगार बाग. कडक उन्हाळ्यामध्ये चार एकरवर हिरवीगार केशर आंब्याची बाग पाहताक्षणी निवांत आराम करावा असंच प्रसन्न वातावरण विलास कदम व योगेश कदम यांनी सौंदाना परिसरात केले आहे.
सौंदाना परिसरात विलास कदम व योगेश कदम यांनी शेतामध्ये चार एकरवर केशर आंब्याची बाग फुलवली असून सध्या कडक उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या बागेत गेल्यानंतर निवांत आराम करण्यासारखं वातावरण आहे. विलास कदम हे आडत व्यापार करत शेतीकडे लक्ष देतात तर दुसरे बंधू योगेश कदम हे शाळा पाहून शेतीकडे लक्ष देत देत शेतामध्ये चार एकरवर केशर आंब्याची बाग फुलवली आहे. त्यांच्या उत्कृष्ट निवेजनातून आणि जिद्द संघर्षाच्या जोरातून केशर आंब्याचा बाग फुलवली आहे. येणाऱ्या काळात कष्टाची आणि संघर्षाचे गोड फळे चाखायला मिळतील कारण की कष्टाच्या आणि संघर्षाच्या झाडाला नक्कीच गोड फळांचा आस्वाद मिळतोच मिळतो हे तितकेच खरे आहेत.
★कष्ट केले तर फळ मिळतच – योगेश कदम
कोणत्याही क्षेत्रात कष्ट केले तर त्याचा फळ नक्कीच मिळत त्याच पद्धतीने शिक्षण करत शेतीकडे लक्ष देण्याची पहिल्यापासूनच आवड आहे. आमचे बंधू आडत व्यापार करत शेतीकडे थोडाफार लक्ष देतात व मार्गदर्शन करतात आणि आम्हालाही सर्व परिवारांना कष्ट करण्याची आवड असल्याने चार एकर केसर आंब्याची हिरवीगार बाग बघायला मिळत आहे एकूणच कष्ट केले तर फळ मिळतं त्यामुळे पहिल्यापासूनच सर्व परिवार क्षेत्र कोणतेही असले तरी तितकंच कष्ट करते त्यामुळे आज हे हिरवीगार आंब्याच्या बागेत दृश्य पाहायला मिळत आहे.
-योगेश कदम, शिक्षक
★कष्ट आणि नियोजन उत्तम असल्या की योग्य पर्याय मिळतो – विलास कदम
शेतकऱ्यांमध्ये कष्ट करण्याची क्षमता असते परंतु नियोजन नसल्याने शेती परवडत नाही पण शेती करताना कष्ट करण्याची ताकद आणि त्याला नियोजनाची जोड असली की कोणतीही गोष्ट सहज शक्य होते आणि आपल्याला अपेक्षित असं उत्पन्न मिळतं यात तीळ मात्र शंका नाही, त्याचबरोबर सर्व परिवार जर एकजुटीने कष्ट करण्यासाठी उतरला तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे सिद्ध होतं त्यामुळे कष्ट आणि उत्तम नियोजन असल की कोणतीच गोष्ट अशक्य नाहीत त्याच पद्धतीने आमची चार एकरवरची केशर आंब्याची बाग ही सुद्धा कष्ट आणि उत्तम नियोजनातून फुलली आहे.
-विलास कदम
आडत व्यापारी पाटोदा.