6 C
New York
Tuesday, April 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

मराठ्यांनो! कोटीने एकत्र येण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज व्हा – मनोज जरांगे पाटील

आठशे एक्करवर सभेसाठी जागेचा शोध सुरु ; पुन्हा एकदा मराठ्यांचा एल्गार!

★अनेक वर्षांनी जरांगे पाटलांच्या माध्यमातून मराठा समाजाला नेतृत्व मिळाले- महादेवानंद भारती महाराज

★अश्वत्थलिंग संस्थानवर मराठ्यांचा जनसागर उसळला

कुसळंब | सचिन पवार

आम्ही ओबीसीतून आरक्षण मागीतले, परंतु न मागताच पन्नास टक्क्याच्या वर दहा टक्के आरक्षण देऊन मराठा समाजाची घोर निराशा केली. गेल्या दोन वेळेला हे आरक्षण टिकले नाही, आणि हे देखील टिकेल कशावरून ? आजच अनेकजण कोर्टात गेले आहेत, कोर्टाने देखील आमच्या निर्णयाच्या अधिन राहुन भरती प्रक्रिया करावी त्यामुळे दहा टक्क्याची आरक्षणाची देखील टांगती तलवार आहे, तथापि आम्ही ओबीसी मधुन आरक्षण माघत आहोत आणि ते घेतल्याशिवाय शांत बसणार नाही आसा ईशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तर मराठा समाजाने पुन्हा एकदा पाच कोटीच्या संख्येने एकत्र येण्यासाठी तयारीला लागावे, आठशे एक्कर जागेचा शोध सुरु असल्याचे सुचक विधान करुन मराठा समाजाची सुनामी पुन्हा एकदा जगाला पहायला मिळणार आहे.
पाटोदा तालुक्यातील श्री.श्रेत्र अश्वत्थलिंग संस्थानच्या महाशिवरात्रीमहोत्सवा निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहच्या सांगतासमारोप प्रसंगी त्यांनी मराठा समाज बांधवांशी संवाद साधला.व्यासपीठावर महादेवानंद भारती महाराज, परमानंद भारती महाराज, शिवानंद भारती महाराज, प्रेमानंद महाराज आदी उपस्थित होते.प्रारंभी व्यासपिठावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालुन पुजन करण्यात आले. त्यानंतर संस्थानच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले.या प्रसंगी महादेवानंद भारती महाराज म्हणाले की, मनोज दादा हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत.त्यांचे कार्य निश्चितच गौरवास्पद असुन गोरगरीब मराठ्यांच्या हिताचे आहे. गेल्या सहा महिन्यात त्यांनी अनेकदा उपोषणे केली, त्यामुळे त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नाही, आता त्यांनी यापुढे उपोषणे न करता लढा देऊन आरक्षणाची लढाई जिंकावी असे अवाहन करीत सत्तर वर्षात प्रथमच मराठा समाजाला चांगले नेतृत्व मिळाल्याची भावना व्यक्त केली.या प्रसंगी मनोजदादा जरांगे यांनी आरक्षण प्रश्नी शासनाने घात केल्याचा उल्लेख करीत अजुनही वेळ गेलेली नाही, शासनाने शहाने होत अद्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी, हाच मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल. पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, आजचा कार्यक्रम सप्ताह समाप्तीचा आहे. महाप्रसादाची पंगत सोडुन मराठा समाज उपाशीपोटी आपल्या लेकरांना सावलीत ठेवण्यासाठी उन्हात ताटकळत बसला आहे.साडेतीनशे वर्षानंतर क्रांती घडत असुन समाज परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. गेल्या सत्तर वर्षांपासून मराठा समाजावर अन्याय सुरु आहे. अन्यायाला देखील परिसिमा असते आता अन्यायाचा कडेलोट झाला आहे, आणि त्याचाच बदला म्हणुन हे सरकार सापडासुप झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगत शिंदे साहेब आम्हाला आरक्षण देतील अशी आशा होती परंतु, त्यांनी देखील मराठा समाजाचा घात केला.उपोषण सुरु असताना माझ्याकडुन चुकुन शब्द गेला परंतु, माझ्या आई बहीणींची डोके फोडली तेंव्हा कोठे होते? मी बोललो की विधानसभेत माझ्या विरोधात मराठा मंत्री, आमदार एकत्र होऊन फडणवीस यांची बाजु घेऊन माझी एस.आय.टी.लावण्याची मागणी करीत होते. अंतरवालीत लाठीमार झाला त्यावेळी का बोलले नाहीत असा सवाल देखील जरांगे यांनी उपस्थित करीत माझी एस.आय.टी. चौकशीसाठी वाट पाहुन आहेत, परंतु अद्याप एस.आय.टी. येईना. माझ्याकडे काय आहे. घरावर पत्रे आहेत, बिनधास्त माझी चौकशी करा, ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हाटनार नाही, भले मला जेल मध्ये जावे लागले तरी हरकत नाही, तिथेही आरोपींना सोबत घेत आरक्षणाचा लढा सुरुच ठेवील असे जाहीर केले. चलो मुंबईचे बँनर हटवले जात आहेत या मागे कोण आहे याची चौकशी केली तर वरुन सांगितले आहे असे सांगितले जाते, तुम्ही आमचे बँनर काढताल परंतु मी मराठा समाजाच्या ह्मदयात आहे तेथुन काढु शकत नाहीत, असे सांगत मराठा समाजावर किती अन्याय कराल? माझा करेक्ट कार्यक्रम करील असे काही जण म्हणतात परंतु या निवडणुकीत मराठा समाज त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करेल.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर मराठ्यांचा विश्वास होता, दिलेला शब्द ते पाळतील परंतु त्यांनीही ऐंनवेळी शब्द फिरवला. त्यामुळे मराठा समाजाची नाराजी त्यांनी ओढावून घेतली आहे.ओबीसीतून आरक्षण मागितले पण न टिकणारे दहा टक्के दिले या आरक्षणावर आमदार खुष झाले परंतु सामान्य मराठा नाराज झाला. सरकारने कितीही ताकत लावावी मी पण ओबीसीतूनच आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. मराठा समाजासोबत गद्यारी करणार नाही. समाजाने मला खुप प्रेम दिले आहे. आगोदर आपले लेकरे मोठे करा नंतर राजकारण करा असा उपदेश मराठा समाजाला देत ओबीसी सगेसोयरे, हैद्राबाद गँझेट, सातारा, मुंबई आदिंची तात्काळ अंमलबजावणी करावी नसता घोडा मैदान जवळच आहे, त्यांना दाखवून देऊत असा ईशारा मनोजदादा जरांगे पाटील यांनी दिला. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. एक मराठा लाख मराठा, मनोज दादा तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणेने परिसर दणाणून गेला होता.

★आरक्षण ओबीसीतून मागितलं पण न टिकणारा दहा टक्के दिल!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर मराठ्यांचा विश्वास होता दिलेला शब्द ते पालखील परंतु त्यांनीही ऐनवेळी शब्द फिरवला त्यामुळे मराठा समाजाची नाराजी त्यांनी ओढाळून घेतली आहे. ओबीसीतून आरक्षण मागितलं पण न टिकणारा दहा टक्के दिले या आरक्षणावर आमदार खूप झाले परंतु सर्वसामान्य मराठा नाराज झाला आहे सरकारने कितीही ताकद लावावी मी पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. मराठा समाजासोबत गद्दारी करणार नाही समाजाने मला खूप प्रेम दिला आहे. अगोदर आपले लेकरे मोठे करा नंतर राजकारण करा असा उपदेश मराठा समाजाला देत ओबीसी, सगेसोयरे, हैदराबाद गॅजेट, सातारा, मुंबई इत्यादीची तात्काळ अंमलबजावणी करावी नसता घोडे मैदान जवळच आहे, त्यांना दाखवून देऊ असा इशारा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. हा इशारा देताच एक मराठा लाख मराठा मनोज दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा ने परिसर दणाणून गेला होता.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!