जाधववाडी ग्रामपंचायतकडून बाळासाहेब तांबे यांचा सत्कार
पाटोदा | प्रतिनिधी
आष्टी पाटोदा शिरूर तालुक्याचे भाग्यविधाते विकास पुरूष आदरणीय बाळासाहेब आजबे काका यांच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही तालुक्यात युवकांचे संघटन मजबूत करण्यासाठी अनेक नवीन चेहर्यांना संधी देत त्यांच्या कडुन गोरगरीब जनतेची सेवा घडावी म्हणून अनेकांची निवड केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष दीपक दादा घुमरे व युवक तालुका अध्यक्ष युवराज झुनगुरे यांच्या शिफारशीनुसार निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आला.त्यामध्ये जाधववाडी ग्रामपंचायतीचे युवा नेता बाळासाहेब तांबे यांची पाटोदा तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली त्यानिमित्ताने जाधववाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सुभाष मारूती घोळवे, उद्योगपती अशोक शेट दहिफळे, आमचे ग्रामपंचायत सदस्य अर्जुन भाऊ जाधव, बाबासाहेब सोनवणे, तुळशीराम दहिफळे बाबुराव दहिफळे, राजु घोळवे इत्यादी या सर्वांनी सत्कार करून गावच्या विकासासाठी आपल्या पदाचा उपयोग करावे,अशी सदिच्छा व्यक्त करून ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या आहेत.