सन्मान लेखणीचा, सन्मान कर्तुत्वाचा, सन्मान उद्याच्या भविष्याचा!
★संगमनेर येथे संजीवनी फाउंडेशनचा शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळा संपन्न
संगमनेर | वृत्तांत
संजीवनी फाउंडेशन च्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार यावर्षी संगमनेर येथे रविवार दिनांक 3 मार्च रोजी सकाळी दहा वाजता मालपाणी हेल्थ क्लब संगमनेर येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. महाराष्ट्रातून आलेल्या सर्व पुरस्कार विजेत्यांचे स्वागत आयोजकांकडून करण्यात आले होते.
शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2024 पुरस्कार वितरण सोहळा संगमनेर येथे रविवार 3 मार्च रोजी मालपाणी हेल्थ क्लब संगमनेर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे व कॅन्सर स्पेशालिस्ट डॉ.जयश्री थोरात या उपस्थित होत्या यांच्या उपस्थितीमध्ये सर्व पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. सर्व पुरस्कार विजेत्यांच्या पाठीवर उपस्थित मान्यवरांनी कौतुकाची थाप देत येणाऱ्या काळात आपल्या हातून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपापल्या ठिकाणी आपापल्या कर्तुत्वाच्या जोरावर भर टाकण्यासाठी प्रयत्न करावेत असे देखील मान्यवरांकडून मनोगतातून सांगण्यात आले. यावेळी संजीवनी फाउंडेशन चेअरमन ज्ञानेश्वर सानप, रोशन सानप, गणेश सांगळे यांच्यासह सर्व पदाधिकारी व पुरस्कार विजेते उपस्थित होते.
★प्रा.सचिन पवार यांच्या लेखणीचा संगमनेर मध्ये सन्मान!
बीड जिल्ह्यामध्ये पत्रकारित क्षेत्रात आपल्या लेखणीच्या जोरावर वेगळीच ओळख निर्माण करणारे पत्रकार सचिन पवार यांच्या लेखणीची दखल घेत संजीवनी फाउंडेशन च्या वतीने दिला जाणारा शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2024 चा जाहीर झाला खऱ्या अर्थानं त्यांच्या लेखणीचा सन्मान झाला असंच म्हणावं लागेल. हा सन्मान मिळताक्षणी शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातील मान्यवर कडून करण्यात आला.