पै.सतीश शिंदे ठरतायत युवकांसाठी प्रेरणास्थान !
★वस्ताद सोपान शिंदे यांच्या मार्गदर्शनामुळे युवकांना मिळते घडण्याची संधी!
आष्टी | सचिन पवार
युवकांचे प्रेरणास्थान पै.सतीश आबा शिंदे यांच्या संकल्पनेतून अनेक वर्षापासून कार्यरत असलेली जय हनुमान तालीम युवकांच्या भविष्याच्या यशस्वी होण्याचा मार्ग ठरत आहे. युवकांना त्यांच्या यशाची गुरुकिल्ली म्हणजेच जय हनुमान तालीम असं म्हटलं तर वावगं वाटायला नको कारण की हजारो युवकांनी आपल्या यशाची शिदोरी जय हनुमान तालीम मधूनच घेतली आहे.
आष्टीच्या जय हनुमान तालीम मधून हजारो युवक चांगल्या पदावर पोहोचले आहेत येणाऱ्या काळात देखील जय हनुमान तालीम चे संकल्पक सतीश आबा शिंदे यांचा संकल्पनेतून व वस्ताद सोपान शिंदे यांच्या मार्गदर्शनातून हजारो युवकांना आपल्या यशाची गुरुकिल्ली मिळाली आहे. आत्ता शिंदे संदीप हरिदास या युवकाची इंडियन आर्मी मध्ये निवड झाली आहे त्याबद्दल जय हनुमान तालीम चे संकल्पक पै.सतीश आबा शिंदे, वस्ताद सोपान शिंदे, बंडू वायकर, डॉ.तावरे यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान सोहळा पार पडला यावेळी जय हनुमान तालीम मधील सर्व पैलवान उपस्थित होते.
★युवकांच्या यशाची गुरुकिल्ली जय हनुमान तालीम!
आष्टी तालुक्यासह इतर तालुक्यातील देखील युवकांसाठी जय हनुमान तालीम गुरुकिल्ली ठरत आहे. पैलवान सतीश आबा शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेली जय हनुमान तालीम आणि वस्ताद सोपान शिंदे यांच्या मार्गदर्शनामुळे हजारो युवकांना आपल्या यशाची गुरुकिल्ली मिळू लागली आहे.