★बीड शहरात रक्तदान, वृक्षारोपण, अनाथ बालकांना पाठ्यपुस्तक वाटप इत्यादी उपक्रमाचे आयोजन
बीड | प्रतिनिधी
सदैव सामाजिक उपक्रमात सहभागी असणारे व सर्व सामान्यांच्या अडी अडचणी वेळी हाकेला धावून जाणारे तसेच राजमुद्रा सामाजिक संघटना मराठवाडा प्रमुख दिलदार व्यक्तीमत्व असणारे श्री.बबलु भैया शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राजमुद्रा सामाजिक संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 01/03/2024 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन राजमुद्रा सामाजिक संघटना कार्यालय, अंबिका चौक, पांगरी रोड, बीड येथे आयोजित केला आहे. तसेच या वाढदिवसानिमित्त राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या माध्यमातून बीड शहरात विविध सामाजिक कार्यक्रम रक्तदान शिबीर, वृक्षारोपण कार्यक्रम, अनाथ बालकांना पाठ्यपुस्तके वाटप कार्यक्रम आयोजित केले आहे. या सामाजिक उपक्रमात बीड जिल्ह्यातील राजमुद्रा सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व बबलु भैया शिंदे यांचे खंदे समर्थक या रक्तदान शिबीरात हजर राहून आपले मोठे योगदान देणार आहेत. बबलु (भैय्या) शिंदे हे दरवर्षी प्रमाणे आपल्या वाढदिवस दीवशी रक्तदान करुन आपल्या मित्र मंडळींनाही रक्तदान करण्यास आवर्जुन प्रेरीत करुन ते समाजाला रक्तदान महादान हा संदेश देण्याच काम ते आपल्या वाढदिवस दीवशी करतात. बबलु (भैय्या) शिंदे हे रक्तदान शिबिराचा उपक्रम राबवून गेल्या दहा वर्षांपासून रुग्ण सेवा करत आहेत. यानिमित्ताने दिनांक 01/03/2024 रोजी बबलु भैय्या शिंदे यांचा वाढदिवस असुन. यादिवशी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केला आहे. या रक्तदान शिबीरात बीड जिल्ह्यातील रक्ददाते व मित्र मंडळी यांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवून बबलु भैय्या शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येयचे आहे. असे आवाहन राजमुद्रा सामाजिक संघटनाचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक, बीड जिल्ह्यातील युवकांचे नेते किशोर आप्पा पिंगळे यांनी केले आहे.
★मराठासेवक किशोर पिंगळे यांचे मावळे म्हटल्यावर सामाजिक उपक्रम होणारच!
बीड जिल्ह्यामध्ये राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी धावणारी संघटना आणि मराठासेवक किशोर पिंगळे यांचे नाव आघाडीवर आहे आणि त्यांचे कार्यकर्ते सामाजिक कार्यक्रमात आघाडीवर असतात त्याच पद्धतीने मराठवाडा प्रमुख बबलू भैय्या शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिर वृक्षारोपण पाठ्यपुस्तक वाटपाच्या सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा केला जातो यावर्षी देखील त्याच पद्धतीने तेच उपक्रम घेत वाढदिवस साजरा केला जात आहे यातून किशोर पिंगळे यांनी युवकांच्या मनावर सामाजिक बांधिलकीचं ठेवलेलं माणुसकीच ओझं आज देखील युवक पेलायला सक्षम आहेत…