★रस्त्याची विभागीय गुण नियंत्रण पथकामार्फत तपासणी करावी व रोड इस्टीमेट प्रमाणे अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन
पाटोदा | प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील रा.म.मा-५६१ जवळाला फाटा ते ग्रामीण रुग्णालय पाटोदा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्था मार्फत रस्त्याचे काम करण्यात येत आहे. परंतु अंदाजपत्रकाप्रमाणे कंत्राटदाराने दर्जेदार रस्ता न करता खालची खडी वर व बाजुचा मुरुम टाकुन कसलाही भराव न भरता थातुर मातूर बील काढण्याच्या तयारीत आहे. सदर जवळाला ते पाटोदा रस्ता (पॅकेज क्रमांक एमएच ०५९४) ५ किलो मिटर लांबीचा अंदाजे रक्कम रुपये ५.०० कोटी रस्त्याचे भुमिपुजन ०७ जानेवारी २०२४ रोजी झाले. आतापर्यत पाटोदा तालुक्यात कोटयावधी रुपयाची विकास कामे करण्यात आली मात्र राजकीय पाठींबा असणाऱ्या गुत्तेदाराला संगनमताने कामाची विल्हेवाट लावुन पैसे काढण्यात येत आहेत. रस्ता न खोदताच त्यावर आजुबाजून खडी ओढुन थांतुर मातुर काम करण्याच्या प्रयत्नात आहेत. तसेच कामाच्या अंदाजपत्रकाची पाटी न लावता काम चालू आहे. मा. जिल्हा अधिकारी (कॉलक्टार)साहेबांनी सदरील जायमोक्यावर येऊन कामाची पाहणी करुन संबधित गुत्तेदाराला अंदाजपत्रकाप्रमाणे काम विभागीय गुण नियंत्रक कार्यालय मार्फत चौकशी करण्याच्या सुचना देण्यात याव्यात नसता शिवसेनेच्या वतीन रस्त्याचे काम बंद करुन तिव्र अंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा तालुकाप्रमुख मुकुंद शिंदे यांनी दिला आहे.