6.5 C
New York
Wednesday, April 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

” मराठा सगेसोयरे ” आमलबजावणीसाठी आ.बाळासाहेब आजबेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र!

निवडणुकीच्या आधी सगेसोयऱ्याचा मुद्दा निकाली काढा अन्यथा मराठा पुन्हा इतिहास घडवेल!

★बीड जिल्ह्यातील इतर सहा आमदार व दोन खासदार मूग गिळून गप्प का ?

★सगेसोयरेच्या मुद्द्यावर आवाज उठवणारे बीड जिल्ह्यातील पहिले आमदार बाळासाहेब आजबे

बीड | सचिन पवार

मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असताना गेल्या आठ दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिक ज्वलंत केला असून मुंबई महावारीदारीमान 26 जानेवारीला मुख्यमंत्र्यांनी वासी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना सगेसोयरेचा आदेश दिला. याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दिले होते परंतु सरकारकडून सगळे सोयऱ्याचे अंमलबजावणी करण्यास विलंब होत असल्यामुळे परत मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आज पंधरा दिवस झाले आहेत. बीड जिल्ह्यातील एकूण सहा व विधान परिषदेवर एक असे सात आमदार व दोन खासदार आहेत यातील फक्त आष्टी मतदार मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी मुख्यमंत्र्यांना लवकरात लवकर सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करण्यासाठीचे पत्र दिले आहे मात्र इतर सहा आमदारांनी व दोन खासदारांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपली भूमिका अद्यापही पोस्ट केलेली नाही मग याचा अर्थ तुम्हाला सर्वसामान्य मराठा समाजांनी मतदान केले नाही का ? असा संतप्त सवाल मराठा समाजामधून पुढे येत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमदार बाळासाहेब आजबे यांनी पत्र देत त्यांच्या पत्रांमध्ये 27 जानेवारी रोजी शासन आणि मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासंदर्भात सगेसोयरे अध्यादेश काढला होता या अध्यादेशानुसार मराठा समाजाला सरसकट ओबीसी कुणबी दाखले देण्यात येऊन समाजाच्या शैक्षणिक आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा होणार होता परंतु 20 फेब्रुवारीला केलेल्या नवीन अध्यादेशानुसार मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ घेता येणार नसल्याचे दिसून येत आहे. तरी मराठा समाजाची फसवणूक होऊ नये व आरक्षणाचा पूर्ण लाभ मराठा समाजाला व्हावा याकरिता मुख्यमंत्री साहेब आपण यात लक्ष देऊन सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करून मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी आमदार बाळासाहेब आजबे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्याकडे केली आहे तरी दुसरीकडे इतर सहा आमदार व दोन खासदार गप्प का ? असा संतप्त सवाल मराठा समाजामधून उपस्थित होत असून सोशल मीडियावर सर्व समाजाच्या वतीने आमदार खासदारांची खरडपट्टी केली जात आहे.

★हे सहा आमदार गप्प का ? यांना मराठ्यांचे मत नको का ?

बीड जिल्ह्यात एकूण सहा मतदार संघ असून प्रत्येक पाच वर्षाला या सहा मतदारसंघातून सहा आमदार निवडून दिले जातात तर एक यावेळेस विधान परिषदेवर निवडून दिल्या गेल्या आहे. आष्टी मतदार संघातून बाळासाहेब आजबे, परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे, केज मतदार संघातून नमिता मुंदडा, माजलगाव मतदार संघातून प्रकाश साळुंके, गेवराई मधून लक्ष्मण पवार, बीड मधून संदीप क्षीरसागर तर विधान परिषदेवर सुरेश धस हे निवडून आले होते तर बीडच्या खासदार पदी प्रीतम मुंडे विराजमान असून राज्यसभेवर खासदार म्हणून रजनीताई पाटील आहेत परंतु यापैकी एकानेही मराठा आरक्षणाच्या सगेसोयरे मुद्द्याकडे लक्ष वेधले नसून फक्त आष्टी मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी पाठपुरावा केला असून त्यांचे मराठा समाजाकडून आभार व्यक्त केले जात आहेत तर इतर आमदार, खासदारांच्यावर सोशल मीडियावर खरडून टीका केली जात आहे.

★बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार प्रीतम मुंडे यांनी भूमिका स्पष्ट करावी

बीड जिल्ह्यातून भाजप या चिन्हावर खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेलेल्या प्रीतम मुंडे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी सगेसोयऱ्या बाबत राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करा समाजासाठी महत्त्वाचा प्रश्न असलेल्या आरक्षणावर प्रीतम मुंडे यांनी अजून तरी त्यांची भूमिका स्पष्ट न केल्याने मराठा समाजातून तीव्र नाराजीच्या भावना व्यक्त होत आहेत. तरी खासदार प्रीतम मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या सगळे सोयरे बाबत जो अध्यादेश काढण्यात आलेला आहे त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी करावी असे आव्हान सर्व सामान्य गरजवंत मराठ्यांकडून केली जात आहे.

★सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी नाही मग निवडणूक नाही

मराठा समाजाला वाशीच्या सभेतून मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अध्यदेशानुसार सगेसोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा येणाऱ्या निवडणुका होणार नाहीत आणि निवडणुका झाल्याच तर मराठा समाज काय करेल याची शाश्वती देऊ शकत नाही कारण की मराठा समाजाने आज पर्यंत इतिहास घडवला आहे मग येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा मराठा समाज इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही या तिळमात्र शंका नाही.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!