मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांनी केली फडणवीसांची चिरफाड!
★मराठ्यांचा योद्धा मनोज जरांगे पाटील निघाले कोटी मराठ्यांना घेऊन सागर बंगल्यावर
बीड | सचिन पवार
राज्यातील मराठा आरक्षणावरुन राजकारण होत असल्याचा आरोप करत मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अंतारवाली सराटीतून जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, काही लोकांना पुढे करुन मला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. मला संपवण्याचं कटकारस्थान होत आहे. त्यामुळे, आता मीच मुंबईतील सागर बंगल्यावर येतो, असे म्हणत जरांगे आपल्या जागेवरुन उठले अन् अधिक आक्रमक झाल्याचं दिसून आलं. जरांगेंना सहकार्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते सागर बंगल्याकडे जातोय म्हणत ते चालत निघाले आहेत.
जरांगे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राज्यात जे काही चालू आहे, फडणवीसांमुळेच सुरू आहे. फडणवीसांच्या म्हणण्याशिवाय काहीही होत नाही. त्यामुळेच, सगेसोयरे अध्यादेश काढण्यासाठी किंवा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास त्यांचा विरोध असल्याचं जरांगे यांनी म्हटले. जरांगे यांनी आपल्या भाषणात फडणवीसांवर गंभीर आरोप करताना, तुम्हाला माझा बळी हवा आहे, मग मी सागर बंगल्याकडे येत आहे. यावेळी, मधेच माझा बळी गेल्यास मला सागर बंगल्यावर नेऊन टाका, असेही जरांगे यानी म्हटले. यावेळी, जरांगे यांनी आपल्या अंगावरील ब्लँकेट बाजुला सारुन माझ्या सलाईनच्या पट्ट्या काढून टाका, असे म्हणत जागेवरुन उठण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या सहकार्यांना त्यांना पकडून थांबवण्याचा प्रयत्न केला. तरीही जरांगे आपल्या जागेवरुन उठले अन् अधिकच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
मला संपवण्याचं कारस्थान देवेंद्र फडणवीस यांनी रचलं आहे. त्यांच्याच माध्यमातून वेगवेगळी लोकं पुढे करून माझ्यावर वैयक्तिक आरोप केले जात आहेत. फडणवीसांना माझा बळीच हवा असेल तर मी आज त्यांच्या सागर बंगल्यावर येतो, त्यांनी मला ठार करावं. मी सागर बंगल्यावर जाऊन उपोषण करणार आहे, अशी घोषणाही जरांगे यांनी केली. यावेळी, राजकीय नेत्यांची उदाहरणे देत फडणवीस हे दमदाटी आणि धाक दाखवून पक्ष आणि नेते फोडत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला आहे. तसेच, माझ्यावर करण्यात आलेले आरोप सर्व खोटे असून त्यांनी तक्रार दाखवा मी तुमचं ऐकेन, असेही म्हटले.माझ्याविरुद्ध महिलेची एक जरी तक्रार सापडली तर तुम्ही म्हणेन ते ऐकेन. गेल्या ३० वर्षात कुठेही माझ्याविरुद्ध महिलेची एक तक्रार असेल तरी मी तुम्ही सांगाल ते ऐकेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तुम्ही एखाद्याच्या वैयक्तिक जीवनात लक्ष नाही घालून शकत, वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा नाही आणू शकत, असे म्हणत मनोज जरांगे यांनी आपल्याविरुद्ध मोठा कट रचला जात असल्याचे म्हटले. माणसं पाठवून मला बदनाम केलं जात असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.
★जाती-जातीत भांडण लावणे फडणवीस काम!
देवेंद्र फडणवीसांचं राजकारण हे जातीजातीत भांडणं लावणं आणि जातीजातीच्या नेत्यांना संपवणे असंच आहे. बहुजन, मराठा आणि ओबीसी संपला पाहिजे, हा त्यांचा डाव आहे, असे म्हणत जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केला. तसेच, मला राजकीय देणं घेणं नाही, मला फक्त मराठा समाजाला आरक्षणासाठी लढायचं आहे. माझा बळी घ्या पण सगेसोयरेची अंमलबजावणी करुनच घेणार, सागर बंगल्यावर आंदोलन करायला येणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलं.
★मराठा समाज संपवण्याचा काम शिंदे पवार त्यात सामील – जरांगे पाटील
मराठा समाजाला संपवण्याचे काम सुरू असून यामागे देवेंद्र फडणवीस सह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची काही लोक सामील असल्याचा गंभीर आरोप जरंगी पाटलांनी केला आहे काही समन्वयक सुद्धा यात सामील आहेत मला बदनाम करण्यासाठी मुंबईत प्रेस घेतली देवेंद्र फडणवीस म्हटले तर नारायण राणे काही करू शकत नाहीत एकनाथ शिंदे यांना हे दोन काहीच करू देत नाहीत असेही जरांगे म्हणाले…
★सलाईनमधून विष देण्याचा, माझं एन्काऊंटर करण्याचा फडणवीसांचा डाव – पाटील
मराठा समाज अधिकच उग्र होत असल्याने सलाईन मधून वीज देण्याचा आणि माझा एन्काऊंटर करण्याचा फडणवीसाचा डाव होता असा गंभीर आरोप मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस तुम्ही माझा बळी घ्या पण खोटे आरोप सहन करणार आहे तुम्हाला कायमचा आयुष्यातून विठ्ठल असा शब्दात जरांगे यांनी फडणवीसांना आव्हान दिले आहे माझा बळी घ्यायचा तर सागर बंगल्यावर घ्या मी आता सागर बंगल्यावर येतोय मला गोळ्या घाला पण खोटे आरोप सहन करणार नाही असेही जरांगे यांनी म्हटले आहे.
★या फोटोची जोरदार चर्चा!
सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक तीव्र होत असताना मनोज जरांगे पाटलांचा रुद्र अवतार पाहून मराठा समाज सुद्धा अधिक रुद्र झालेला पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर अनाजीपंत यांचा फोटो टाकत चांगलीच सोशल मीडिया गरम झालेली पाहायला मिळत आहे. यातून मराठा समाजाचा उद्रेक किती होऊ शकतो याचा अंदाज लावता येणे शक्य नाही त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आता ” सगेसोयरे ” हा मुद्दा तात्काळ निकाली काढावा अन्यथा काय होईल आणि मराठा समाज काय करेल कोणीच काही सांगू शकत नाही फक्त सध्या तरी एवढेच सांगता येत आहे की इतिहास पुन्हा घडू शकतो…