मराठा समाज कुणबी तसंच क्षत्रिय ; शेतीतून सोनू पिकवू शकतो अन् तलवारीने…
★मराठ्यांसाठी सग्या सोयऱ्यांबाबतच्या आरक्षणाचा निकाल महत्त्वाचा ; अन्य घोषणेला महत्त्व नाही
[ मराठे म्हणतायेत जरांगे पाटलांच्या आदेशाची वाट पाहत आहोत! ]
बीड | सचिन पवार
मराठा आरक्षणाचे विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देणार कायदा विधीमंडळात पास करण्यात आलाय.यावर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले. ”हे आरक्षण आमच्यावर थोपवू नका. सरकार देतंय ते आरक्षण आम्हाला नको. मराठ्यांची शक्ती, दम बघायचया आहे का? आम्हाला जे पाहिजे आहे ते आम्ही मिळवणारं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवला म्हणूनच त्यांना 6 महिन्याचा वेळ दिला. प्रत्येक वेळी भावनेच्या आहारी जाऊन आमच्या लेकरांचं वाटोळं होऊ देणार नाही, आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला पाहिजे. हरकती चा विषय पुढे करून एवढ्या मोठ्या समाजाचा अपमान करायचा हे बरोबर नाही.
★सग्या सोयऱ्यांबाबत काय ?
निवडणूक आहे तो पर्यत टिकेल ,उद्या उडाले की बसा बोंबलत. आम्हाला त्या लफडयात पडायचं नाही. सग्या सोयऱ्या बाबत मुख्यमंत्री साहेबांना कोणीतरी काम करू देत नाहीये.
★मराठ्यांनी तलवारी म्यानात ठेवल्यात गांजल्या नाहीत
मराठा समाज हा कुणबी आहे क्षत्रिय आहे त्यामुळे मराठा समाजाच्या भावनाशी खेळू नका समाज जेवढा संवेदनशील आहे तेवढा असवेदनशील सुद्धा आहे त्यामुळे समाजाच्या भावनाशी खेळ हाल तर याद राखा समाजाला शेतीमध्ये कष्ट करून जस सोनं पिकवायचं माहिती आहे, तसं म्यानातून तलवारी काढून लढायचं कसं हे सुद्धा माहिती आहे, मराठ्यांच्या भावनांचा अनावर होईल असं सरकारने वागू नये अन्यथा समजून घ्या….
★आता फक्त जरांगे पाटलांच्या आदेशाची वाट बघतोय मराठा समाज
महाराष्ट्रातील पाच कोटी समाजाने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे नेतृत्व मान्य केलं असून त्यांच्या आदेशाची वाट पाहत असल्याच्या प्रतिक्रिया मराठा समाजामधून सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. मराठा समाजाची मागणी सगळे सोयऱ्यांबाबतची महत्त्वाची आहे त्यामुळे इतर कोणत्याही घोषणा सरकारने केल्या तर त्या मान्य नसतील आणि आता फक्त जरांगे पाटलांचा आदेश येईपर्यंत मराठा समाज शांत आहे एकदा का पाटलांचा आदेश आला का मग सरकारचं काय होईल हे सांगता येत नाही अशा प्रतिक्रिया मराठा समाजामधून येत आहेत. आता मराठा समाज वाट पाहत आहेत ती फक्त जरांगे पाटलांच्या आदेशाची…