★शिवजयंतीनिमित्त वकृत्व स्पर्धेचे आयोजन
कुसळंब | प्रतिनिधी
अवघ्या हिंदुस्थानचे आराध्य दैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसळंब येथे विद्यार्थ्यांच्या वकृत्वाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धेसाठी सहभाग नोंदवत छत्रपती शिवरायांच्या विचारांची देवाणघेवाण केली.
कुसळंब जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त वकृत्व स्पर्धेबरोबर छत्रपती शिवरायांच्या विचारांची देवाण-घेवाण करत शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांची आठवावे रूप या पद्धतीने त्यांच्या विचारांची देवाण-घेवाण करून आचरणात आणण्यासाठी संकल्पना सुद्धा करण्यात आली. येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवराय महापुरुष कळावेत यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक वर्ग सामाजिक उपक्रमाबरोबर वकृत्व स्पर्धेतून विद्यार्थ्यांमध्ये महापुरुषांचे विचार रुजवण्याचे काम करत आहेत त्यांच्या या कार्याबद्दल गावातील नागरिकांस कडून सुद्धा कौतुक केले जात आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित केलेल्या वकृत्व स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यातील वेगळेपण आणि त्यांच्यातील गुण दिसून आले महापुरुषांबद्दलची त्यांच्यामध्ये असलेली आस्था आपुलकी प्रेम आदर पाहायला मिळाला यावेळी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गोसावी सर, साळुंखे सर, अंकुश सर, वीर सर, चव्हाण सर, शालेय व्यवस्थापक अध्यक्ष नामदेव पवार, भाऊसाहेब पवार, सामाजिक कार्यकर्ते अतुल शेलार यांच्यासह गावातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.