★स्वराज्य सप्ताहासाठी 47 विद्यार्थ्यांचा सहभाग
पाटोदा | प्रतिनीधी
पाटोदा येथे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे स्वराज्य सप्ताहा निमित्त जयभवानी महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत पाटोदा तालूक्यातून विविध शाळा महाविद्यालयातून 47 स्पर्धक सहभागी झाले होते या कार्यक्रमास उदघाटनास युवा नेते महेश भय्या आजबे, राष्ट्रवादी अध्यक्ष दिपक दादा घुमरे, जुनेद शेख, अविनाश पवार ,भाऊसाहेब भराटे, बप्पासाहेब जाधव, राजेंद्र सकुंडे, अण्णासाहेब लवांडे पाटील, अंगद भोंडवे, आनंद घुमरे सरपंच, रियाझ सिद्धीकी, राहुल बामदळे, संजय घोषिर, शिक्षक सेलचे प्रा.गोपाळ धांडे हे तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रा सोमनाथ घाडगे सर परीक्षक म्हणून वाघे पी एच, डॉ रामकृष्ण प्रधान, उगले उमेश, देवगुडे अशोक, प्रा.प्रकाश नाईकवाडे आदी हजर होते विजेत्या वक्त्यांना प्रथम बक्षीस – 3001, द्वितीय बक्षीस -2051, तृतीय 1500, उत्तेजनार्थ 1000 रु प्रदान करण्यात आले सर्व सहभागी विध्यार्थाना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहेत.