★राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून ” उत्सव स्वराज्याचा स्वराज्य कार्याचा ” उपक्रम – दिपक घुमरे
पाटोदा | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे राज्यभर स्वराज्य साप्ताह आयोजित केला असून याचाच भाग म्हणून जिल्हा भरात वक्तृत्व स्पर्धा, गडकिल्ले स्वछता, छत्रपती शिवाजी महाराज वेशभूषा स्पर्धा, पालखी मिरवणूक, रांगोळी स्पर्धा आदी आयोजित केली असून राज्यभर स्वराज सप्ताह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने आयोजित केला जात असून याचा भाग म्हणून पाटोदा येथे तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धा जयभवानी महाविदयालय पाटोदा येथे आयोजित केला असून तालुक्यातील सर्व शाळांनी 8 वि ते 12 वि पर्यंत चे किमान 2 स्पर्धक पाठवावेत स्पर्धा दि 17/02/2023 रोजी दु 12:00 वा स्थळ जयभवानी महाविद्यालय l, पाटोदा विषय छत्रपती शिवाजी महाराज मॅनेजमेंट गुरु, शिजसन्मापूर्वीचा आणि नंतर चा महाराष्ट्र,आठरा पगड जातीचे स्वराज्य या तीन विषयावर स्पर्धा ठेवली असून तालुक्यातील जास्तीत जास्त मुलांनी हजर रहावे असे आवाहन अविनाश पवार यांनी केले आहे.