12.3 C
New York
Tuesday, April 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

व्हॅलेंटाईन स्पेशल…!

व्हॅलेंटाईन स्पेशल…!

नुसतं छपरिपणा करून “आय लव्ह यु”, म्हटलं म्हणजे प्रेम होत नसत.. प्रेम ही एक स्वच्छ सुंदर अन निखळ भावना आहे ..!
एखाद्याला प्रत्यक्ष न बघता ही त्याच्या प्रेमात पडता आलं पाहिजे, कारण प्रेम हे चेहरा बघून नाही तर स्वभाव बघून करण्याची गोष्ट आहे ..! सुंदर चेहरा बघून प्रेम करणं आणि गावभर ही माझी आयटम आहे किंवा तो माझा प्रियकर आहे हे सांगत फिरणं म्हणजे विकृती होय..! चेहरा बघून एखाद्या मुलीच्या मागे लागायचं तिला सतत फॉलो करायचं , तिला इरिटेड होईल असं वागायचं, तीचं बाहेर फिरणं कॉलेज ला जाण मुस्किल करायचं याला प्रेम म्हणत नाहीत तर विकृती म्हणतात…!
तसच एखाद्या मुलाकडे गाडी, पैसा बघून त्याच्याबरोबर फिरणं,आपली हौस मौज भागवून घेणं त्याच्या संपत्तीकडे बघून प्रेम करणं आपण ज्या मुलाशी प्रेम करतो त्याची पार्श्वभूमी व स्वभावगुण न समजून घेता आपल्या गरजा पूर्ण करणं आणि वेळ आल्यावर त्याला दोष देऊन मोकळं होणं यालाही प्रेम म्हणत नाहीत, तर ती सुद्धा एक विकृतीच असते…!
प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घेणं , एकमेकांचा आदर करणं, एकमेकांच स्वातंत्र्य जपंण, एकमेकांच्या मतांचा आदर करणं, आणि कुठल्याही परिस्थितीत एकमेकांचा हात न सोडण ही प्रेमाची सहज सुंदर व्याख्या होऊ शकते..!
नाहीतर दुधाचे दात पडायला उशीर की आजकाल मुला मुलींना प्रेम होतं, आणि मग कुठल्याही परिणामाची तमा न बाळगता पळून जायचं आणि वडापाव खाऊन घरी यायचं, कारण कमवायच कसं याची अक्कल आलेली नसते. आणि मग होणारे परिणाम हे भविष्यावर विपरीत परिणाम करणारे असतात.प्रेम म्हणजे वासना नव्हे, बळजबरी नव्हे, तर प्रेम म्हणजे साधना, प्रेम म्हणजे विश्वास , प्रेम म्हणजे जिव्हाळा, प्रेम म्हणजे आपुलकी. हे समजून घेणं गरजेचं असतं.
आज या व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने सर्व खरं खरं प्रेम करणाऱ्या प्रेमी युगुलांना वेलेंटाईन डे च्या खूप खूप शुभेच्छा…..!

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!