वाघिऱ्याच्या आजबे कुटुंबीयांकडून कुटुंबाच्या एकोप्याचे दर्शन!
★ह भ प नाना महाराज कदम व ह भ प भानुदास महाराज शास्त्री यांचे कीर्तन तर रक्तदान शिबिर सामाजिक संदेश!
पाटोदा | प्रतिनिधी
आपल्या स्वतःच्या वेगळेपणामुळे वाघिरा सह पंचक्रोशीतील जनसामान्यातील परिचित असणारे व्यक्तिमत्व विनायक भाऊ अजबे यांची पुण्यतिथी दरवर्षी त्यांचे कुटुंबीय सामाजिक उपक्रमातून साजरी करतात गेल्या बारा वर्षापासून हे सातत्य टिकून आहे यावर्षी ह भ प नाना महाराज कदम यांचे व ह भ प भानुदास महाराज शास्त्री यांचे कीर्तनातून समाज प्रबोधनाचा संदेशा बरोबर रक्तदान शिबिर घेऊन सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे हे उपक्रम गेल्या बारा वर्षापासून सातत्याने आजबे कुटुंबीय करत आहे.
स्वर्गीय विनायक भाऊ आजबे यांच्या बाराव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त श्री विनायकराव बहुउद्देशी सेवाभावी संस्था बीड कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य व समस्त आजबे कुटुंबीयांकडून पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त रविवार दिनांक 04/02/2024 रोजी संध्याकाळी 9 ते 11 या कालावधीमध्ये ह भ प नाना महाराज कदम यांचे कीर्तनाचे आयोजन केले होते तर सोमवार दिनांक 05/02/2024 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत ह भ प भानुदास महाराज शास्त्री खोले यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते त्याचबरोबर रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करून सामाजिक संदेश देण्याचा आजबे कुटुंबीयांकडून गेल्या बारा वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे. आलेल्या सर्व मान्यवरांसाठी भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती. वाघिरा येथील आजबे कुटुंबीय आज देखील एकोप्यानं राहून सामाजिक संदेश देण्याचा महत्त्वाचा आणि सध्याच्या काळामध्ये गरजेचा असलेला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. भानुदास महाराज शास्त्री यांचे कीर्तन झाल्यानंतर सर्वांना जेवणाचे आयोजन करण्यात आले होते व आलेल्या सर्व पाहुण्यांचे आजबे परिवाराकडून गणेश आजबे सर यांनी आभार व्यक्त केले.
★किर्तन आणि रक्तदानातून सामाजिक संदेश!
स्वर्गीय विनायक भाऊ आजबे यांच्या बाराव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कीर्तन आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करून आजबे कुटुंबीयांनी सामाजिक संदेश देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. स्वर्गीय विनायक भाऊ आजबे यांचे कर्तृत्व त्यांच्या या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमातून सर्व वाघिरा सह परिसरातील पंचक्रोशीतील नागरिकांना माहिती आहे परंतु या उपक्रमातून त्यांचं कर्तुत्व अधिक मोठं असल्याचं दिसून येत आहे.
★आजबे कुटुंबीयांचे एकत्रित कुटुंब सर्वांसाठी आदर्श!
वाघिरा येथील आजबे कुटुंबाचे एकत्रित कुटुंब सर्वांसाठी आदर्श ठरत आहे. सध्याच्या काळामध्ये नवरा बायकोचे सुद्धा पटत नाही परंतु वाघिरा येथील आजबे कुटुंब आज देखील पाच-सहा भावंड एकत्रित राहून समाजाला एक उपाय असा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे.